Raj Thackeray video from Ira and Nupur's Wedding Reception : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. जिकडे तिकडे त्यांच्या लग्नाचे आणि लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर नुकतंच आयरा आणि नुपूरचं मुंबईत वेडिंग रिसेप्शन झालं. त्यांच्या रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात काही राजकारणी देखील होते. त्यात राजकारणी लोकांनी देखील हजेरी लावली होती. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील आहेत. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत राज ठाकरे हे त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत दिसत आहेत. राज ठाकरे यांनी यावेळी हिरव्या रंगाच्या शेडचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे. तर त्यासोबत त्यांनी शॉलही घेतली आहे. दुसरीकडे त्यांची पत्नी शर्मिला यांनी लाल रंगाची साडी नेसली आहे. त्या दोघांच्या मराठमोळ्या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी एकत्र आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावली. जेव्हा त्यांनी कार्यक्रमात एन्ट्री केली तेव्हा सगळ्यात आधी पापाराझी त्यांच्याकडे फोटोची मागणी करताना दिसले. त्यानंतर राज ठाकरे पापाराझींना म्हणाले की मी डाव्या बाजू पासून उजव्या बाजूला पाहाणार. ओरडू नको. त्यानंतर पापाराझी त्यांना होकार देतात की आम्ही ओरडणार नाही. राज ठाकरेंशिवाय आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शन पार्टीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावली होती.
राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'बाळासाहेब यांच्या नंतर फक्त एकच कट्टर हिंदू नेता आपल्या महाराष्ट्रत आहे सन्मान. राजसाहेब ठाकरें'.
हेही वाचा : लेकीच्या रिसेप्शनला आई का नाही? आयराच्या रिसेप्शनला किरणच्या गैरहजेरीबद्दल आमिर खुलासा करत म्हणाला, 'ती...'
आयरा आणि नुपूर यांनी 3 जानेवारी रोजी मुंबईत रजिस्टर लग्न केलं. त्या आधी त्या दोघांचं केळवण झालं होत आणि मग त्यात आयरानं घेतलेल्या उखाण्यांची चर्चा. आयरा आणि नुपूर यांनी त्यानंतर उदयपुरमध्ये शाही विवाह केला. त्यांच्या लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात नुपूरनं केलेल्या डान्सचा व्हिडीओ तर चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.