पंतप्रधान मोदींची तैमुरसाठी खास भेट; कपूर कुटुंबाच्या भेटीमागे 'हे' कारण

सोशल मीडियावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबाचे फोटो व्हायरल होत आहे. या भेटी मागचं कारण काय? तसेच सोशल मीडियाला भुरळ घातलेल्या तैमुरने पंतप्रधान मोदी यांना देखील आपली दखल घ्यायला लावली. ते कारण काय? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 11, 2024, 06:04 PM IST
पंतप्रधान मोदींची तैमुरसाठी खास भेट; कपूर कुटुंबाच्या भेटीमागे 'हे' कारण title=

कपूर कुटुंबीयांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या आरके फिल्म फेस्टिव्हलचे निमंत्रण दिले. यावेळी आलिया भट्ट, रणबीर कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर साहनी, आधार जैन, अरमान जैन आणि नीतू सिंह देखील उपस्थित होते. भेटीदरम्यान, करीना कपूरने तिच्या दोन मुलांसाठी, तैमूर आणि जेहसाठी पंतप्रधानांनी एक खास गोष्ट केली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पीएम मोदींची खास भेट 

करीना कपूर खान आणि नीतू सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण कपूर कुटुंबातील भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिवंगत अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक राज कपूर यांना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यात येणार आहे. कपूर कुटुंबाला हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले कुटुंब म्हटले जाते. यानिमित्ताने एका चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये राज कपूरचे काही खास चित्रपट दाखवले जाणार आहेत. कपूर कुटुंबातील सदस्यांनी पीएम हाऊसमधील पीएम मोदींसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. भरत साहनी, रीमा जैन, अनिसा मल्होत्रा, निताशा नंदा, मनोज जैन आणि निखिल नंदा देखील चित्रांमध्ये दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

तैमुरसाठी खास भेट

करीना कपूर खानची दोन्ही मुले - तैमूर अली खान आणि जे अली खान या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. करिनाने पंतप्रधानांना तिच्या मुलांसाठी एक विशेष चिठ्ठी लिहिण्याची विनंती केली, ज्याने सर्वांची मने जिंकली. करिनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये जेह आणि तैमूरची नावे त्या पोस्टवर लिहिली आहेत आणि दोघांच्या नावाच्या खाली पंतप्रधानांनी त्यांची सही केली आहे. करीना आपल्या मुलांना 'टिम ॲण्ड जेह' या नावाने हाक मारते. कार्यक्रमादरम्यान काढलेल्या सर्वात संस्मरणीय फोटोंपैकी एक या फोटोमध्ये करीना अभिमानाने हसताना दिसत आहे.

करीना मानले आभार 

दिल्लीतील या भेटीची छायाचित्रे शेअर करताना करीना कपूरने लिहिले 'आम्ही आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आमचे आजोबा, थोर राज कपूर यांच्या असामान्य जीवनाची आणि वारशाची 100 वर्षे साजरी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आम्हाला खूप सन्मान वाटतो. या विशेष भेटीसाठी, श्रीमान मोदीजी, धन्यवाद. हा मैलाचा दगड साजरा करण्यासाठी तुमची कळकळ, लक्ष आणि पाठिंबा म्हणजे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.