प्रभास आहे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा फॅन!

‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा दाक्षिणात्य अभिनेता म्हणजे प्रभास

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 12, 2017, 09:17 AM IST
प्रभास आहे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा फॅन! title=

मुंबई : ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा दाक्षिणात्य अभिनेता म्हणजे प्रभास. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. पण प्रभास कोणाचा चाहता आहे माहितीये? 

कोण आहे ती ?

ती बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे रविना टंडन. एका मुलाखतीत त्याने त्याच्या आवडत्या बॉलीवूड अभिनेत्रीबद्दल सांगितले. तो म्हणाला, मी रविनाचा खूप मोठा चाहता आहे. मी जेव्हा जेव्हा ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील ‘एलो जी सनम’ हे गाणं पाहतो, तेव्हा मी भारावून जातो.’ 

 

#aboutlastnight #partyinghyderabadstyle #fun #food #friends #thebahubaliway

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon) on

मस्त पार्टी..

प्रभास रविनाचा फॅन असला तरी रविनाला देखील प्रभास चांगलाच भावतो. काही दिवसांपुर्वी कामानिमित्त हैद्राबादला गेलेल्या तिने ‘बाहुबली’ टीमची भेटही घेतली होती. प्रभास, राणा डग्गुबती आणि अनुष्का शेट्टी यांची भेट घेऊन त्यांनी मस्त पार्टीसुद्धा केली.