PM Modi's Former Security Guard Said No to Bigg boss 18 Offer : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'बिग बॉस 18' या शोचं सुत्रसंचालन करताना दिसत आहे. शो सुरु झाल्यापासून सतत चर्चेत असतो. लवकरच या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या लोकांची नावं समोर येत आहेत. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा माजी सुरक्षा कर्मचारी लकी बिष्टचं नाव समोर आलं आहे. त्याला कथितपणे या शोची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यानं त्यासाठी नकार दिला.
रिपोर्ट्सनुसार, लकी बिष्टनं या शोसाठी मिळणारी एक मोठी ऑफर नकारली. लकीनं सांगितलं की 'एक रॉ एजंट म्हणून आम्हाला नेहमीच आमचं आयुष्य हे गुपीत ठेवावं लागतं आणि त्यात अनेक सिक्रेट असतात आणि खूप कमी लोकांना आमच्याविषयी खरी माहिती असते. आम्हाला कधीच आमचं खासगी आयुष्य जगासमोर आणायला नको यासाठी ट्रेनिंग देण्यात येते आणि मी त्या गोष्टीचं पालन केलं आहे. हा एक असा ऑप्शन आहे ज्याची मी निवड केली आहे आणि मला आनंद आहे की लोकं त्या गोष्टीला सजमून घेत आहेत आणि त्याला पाठिंबा देत आहेत. त्यानं निर्मात्यांशी आणि त्याच्या टीमशी या सगळ्यावर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी लकीच्या आयुष्यावर एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्या पुस्तकाचं नाव 'हिटमॅन: द रियल स्टोरी ऑफ एजेंट लीमा' असं आहे. त्या पुस्तकात त्याची बाजू सगळ्यांसमोर मांडण्यात आली आहे. त्याच्या आयुष्यावर एक चित्रपट येणार असल्याचं म्हटलं जातं आहे.'
लकी बिष्ट हा एक माजी स्नायपर आणि रॉ एजंट आहे. त्यांनं केलेल्या कामांमुळे तो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. लकी बिष्ट हा उत्तराखंडच्या हल्दवानी येथे राहतो.
हेही वाचा : 'तिला चांगला नवरा भेटतचं नाही'; ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना वाटतंय रश्मिकासाठी वाईट
दरम्यान, सध्या बिग बॉस 18 मध्ये एलिस कौशिक, अविनाश मिश्रा आणि ईशा सिंग यांच्यातील मैत्री पाहून घरात आणखी नवीन नाती बनत आहेत. तर दुसरीकडे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोला पाहून त्यांच्यात फूट पडली की काय यावरून चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.