VIDEO : सोनम - अक्षयची भन्नाट केमिस्ट्री

राधिका आपटे, अक्षय कुमार आणि सोनम कपूर अभिनित 'पॅडमॅन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. या सिनेमातलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय.

Updated: Jan 4, 2018, 10:59 AM IST
VIDEO : सोनम - अक्षयची भन्नाट केमिस्ट्री

मुंबई : राधिका आपटे, अक्षय कुमार आणि सोनम कपूर अभिनित 'पॅडमॅन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. या सिनेमातलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय.

'हू ब हू' या गाण्यात अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांची भन्नाट केमिस्ट्री दिसतेय. हा सिनेमा आर बल्की यांनी दिग्दर्शित केलाय. २६ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  

मासिक पाळीसारख्या महत्त्वाच्या विषयावर आजही आपल्याकडं गुप्तता पाळली जाते. मासिक पाळीदरम्यान स्त्रियांचं आरोग्य, स्वच्छता यांसारख्या विषयावर बोललेदेखील जात नाही. नेमक्या याच विषयावर अक्षयचा 'पॅडमॅन' भाष्य करणार आहे. खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणाऱ्या कोइम्बतूर येथील अरुणाचलम मुरुगानंदम यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.