'बापजन्म' सिनेमाचा दुसरा टिझर लाँच

मराठीतील आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेल्या "बापजन्म" सिनेमाचा दुसरा टिझर लाँच झाला आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या सिनेमात सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपुटकर आपल्याला दिसणार आहेत. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 5, 2017, 01:13 PM IST
'बापजन्म' सिनेमाचा दुसरा टिझर लाँच

मुंबई : मराठीतील आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेल्या "बापजन्म" सिनेमाचा दुसरा टिझर लाँच झाला आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या सिनेमात सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपुटकर आपल्याला दिसणार आहेत. 

भास्कर पंडीत नावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सचिन खेडेकरांना डायरी लिहायची फार आवड असते. ते त्यांच्या डायरीमध्ये नित्यक्रम लिहीत असतात. या आधीच्या टिझरमध्ये बापाचा नित्यक्रम नेमकी कसा असतो ते दाखवण्यात आलं होतं. आता या दुसऱ्या टिझरमध्ये भास्कर पंडीत आपलं रूटिन बाजूला ठेवून काही गोष्टी करताना दिसत आहेत. 

यामध्ये भास्कर पंडीत यांची दोन मुलं दाखवण्यात आले आहेत. विणा आणि विक्रम ही दोन मुलं म्हणजे अभिनेत्री शर्वरी लोहकरे आणि सत्यजित पटवर्धन.  यांच्या जोडीला आहे घराघरात दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील लोकप्रिय पात्र "आशू" साकारणारा पुष्कराज चिरपुटकर. 

हा टिझर शेअर करताना म्हटलं आहे की, मी माझ्या मुलांना भेटण्यासाठी काहीही करू शकतो, काहीही! त्यामुळे या टिझरची आणि पर्यायाने सिनेमाची उत्सुकता नक्कीच वाढते. संजय छाब्रिया आणि सुमतिलाल शाह यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या २९ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘हापूस’, ‘आयडियाची कल्पना’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘टाईम प्लीज’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ अशा सिनेमांची प्रस्तुती केलेल्या ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ने ‘बापजन्म’ची प्रस्तुती केली आहे.