मौनी रॉयची सद्गुरूंना खास कारणासाठी भेट; जाणून घ्या

अभिनेत्री मौनी रॉय सध्या पती सूरज नांबियारसोबत तिचं वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. 

Updated: Mar 29, 2022, 05:06 PM IST
मौनी रॉयची सद्गुरूंना खास कारणासाठी भेट; जाणून घ्या title=

मुंबई : अभिनेत्री मौनी रॉय सध्या पती सूरज नांबियारसोबत तिचं वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. लग्नानंतर मौनी सूरजसोबत सद्गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी गेली होती. लग्नानंतर मौनीचा सद्गुरूंसोबतच्या पहिल्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मौनी सद्गुरूंशी संवाद साधताना आणि त्यांची ''सेव सॉयल'' मोहिमेबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे.

मौनीचा सद्गुरूंना प्रश्न
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मौनी सद्गुरुंना त्यांच्या बाईकवर वर्ल्ड टूर करण्याच्या पुढाकाराबद्दल प्रश्न विचारत आहे. मौनीने सद्गुरुंना विचारलं की, बाईकने 30,000 किमी प्रवास करून आणि 26 देशांना भेट देऊन काही धोका पत्करला आहे का?

सद्गुरूंचं उत्तर
यावर सद्गुरू त्यांच्या शैलीत उत्तर देत म्हणाले, "हे पहा, जर ३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असतील आणि त्यानंतरही एखादा देश आणि तेथील जनता शांतपणे झोपत असेल. तर लोकांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं म्हणून काहीतरी करण्याची गरज आहे."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ही सद्गुरूंची मोहीम आहे
ईशा फाऊंडेशन आणि 'कॉन्शस प्लॅनेट मूव्हमेंट' चे संस्थापक सद्गुरु यांनी ब्रिटनची राजधानी लंडनमधील ट्रॅफलगर स्क्वेअर येथून पृथ्वी वाचविण्याच्या त्यांच्या मिशनसाठी 100 दिवसांच्या बाईक प्रवासाला सुरुवात केली. या दौऱ्यात ते 26 देशांना भेटी देतील. या प्रवासात सद्गुरू सुमारे ३० हजार किलोमीटरचं अंतर कापतील. जमिनीची धूप रोखणं आणि जमिनीची सुपीकता वाचवणं हा त्यांच्या भेटीचा उद्देश आहे.