'आम्ही 20 दिवस वाट पाहत होतो,' महिमा चौधरीने केला शाहरुख खानबाबतचा खुलासा 'परदेसच्या सेटवर तो....'

महिमा चौधरीने (Mahima Chaudhary) शाहरुख खानसह (Shahrukh Khan) 'परदेस' (Pardes) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मी परदेसच्या सेटवर शाहरुख खानकडून अभिनयाचे धडे घेत होते असं महिमाने सांगितलं.   

शिवराज यादव | Updated: Oct 14, 2024, 05:17 PM IST
'आम्ही 20 दिवस वाट पाहत होतो,' महिमा चौधरीने केला शाहरुख खानबाबतचा खुलासा 'परदेसच्या सेटवर तो....' title=

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधऱीने 1997 मध्ये 'परदेस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासह शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिमा चौधऱीने शाहरुख खानसह काम करण्याचा अनुभव कसा होता याचा खुलासा केला आहे. परदेस चित्रपटाच्या सेटवर संपूर्ण क्रू 20 दिवस शाहरुख खानची वाट पाहत होता असंही तिने सांगितलं आहे. 

'परदेस चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण शाहरुख खान आज किंवा उद्या येईल असं सांहत होता. पण तो आला नाही. पण जेव्हा तो आला तेव्हा सर्वांना त्याला घेरत गर्दी केली होती. कारण आम्ही सर्वजण तेव्हा नवे होतो आणि त्याला फक्त 'हाय' म्हणण्यासाठी थांबलो होतो. शाहरुख जेव्हा संभाषणाला सुरुवात करतो तेव्हा सर्वजण ऐकत बसतात. त्याच्याकडे इतक्या गोष्टी असतात,' असं महिमा चौधरीने रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

महिमाने यावेळी आपण शाहरुख खानकडून अभिनयाचे धडे घेतले होते असाही खुलासा केला. "मी बसून तो आपले सीन कशाप्रकारे करतो, आपले डायलॉग कसे बोलतो, डान्स स्टेप कशा करतो हे सर्व पाहायचे आणि त्यातून शिकायचे," असं महिमाने सांगितलं.

याआधी एका मुलाखतीत महिमा चौधरीने  पदार्पण करण्यासाठी 'परदेस'पेक्षा दुसरा कोणताच चांगला चित्रपट नसता असं सांगितलं होतं. ते एक स्वप्नवत  होतं अशी भावना तिने व्यक्त केली होती. तिने सांगितलं होतं की, “जेव्हा तुम्ही तुमचा पहिला चित्रपट करत असता, तेव्हा तुम्ही सर्व प्रकारच्या गोष्टींची कल्पना करता. पण परदेसबद्दल मला सांगायला आवडेल की, मी स्वप्नातही विचार केला नव्हता इतकं चांगलं पदार्पण देणारा चित्रपट होता. नशीब नावाची गोष्टदेखील महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण मी सर्वात प्रतिभावान आहे असे नाही. असे बरेच लोक होते जे माझ्यापेक्षा जास्त प्रतिभावान होते”.

सुभाष घई दिग्दर्शित 'परदेसम'ध्ये अपूर्वा अग्निहोत्री, आलोकनाथ, अमरीश पुरी आणि हिमानी शिवपुरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. चित्रपटाची कथा गंगा (महिमा चौधरी) भोवती फिरते, जिची राजीव (अपूर्वा अग्निहोत्री) नावाच्या एनआरआयशी लग्न होते. जेव्हा तिला पाश्चात्य जीवनशैलीशी जुळवून घेण्याचा त्रास होतो तेव्हा गोष्टी गुंतागुंतीच्या होतात.