मुंबई : विद्या बालनने काहीही केलं तरी एक प्रश्न काही विद्या बालनची पाठ सोडतं नाहीय. ज्या प्रकारचे कपडे विद्या बालन सध्या घालते आहे त्यामुळे साहजिकच सगळ्यांची विद्या लवकरच गुड न्यूज देणार, अशी खात्री पटत चाललीय.
विद्याच्या लूझ कपड्यांवर लक्ष दिलं तर हा अंदाज बघून ती बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करते आहे असं दिसतंय... विद्या खरचं प्रेग्नंट आहे?
मुंबईत 'तुम्हारी सुलु' या विद्या बालनच्या सिनेमाची व्रॅप अप पार्टी आयोजित करण्यात आली होती. विद्या जेव्हा या पार्टीत मीडियासमोर फोटो सेशन करण्यासाठी आली तेव्हा सगळ्यांच्याच मनात प्रश्न आला. विद्या प्रेग्नंट तर नाही? विद्या प्रेग्नंट नसेल तर तिला इतके लूझ कपडे घालण्याची गरजचं काय?
या आधीही विद्याचे असे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर विद्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या..पण नंतर विद्याने या बातम्यांचे खंडन करत आपण प्रेग्नंट नसल्याचं सांगितलं होतं..
विद्या या पार्टीत खुपचं मस्तीच्या मुडमध्ये दिसली. पण जेव्हा मीडियाशी संवाद साधण्याची वेळ आली तेव्हा तिथून निघून गेली. परत कोणी प्रेग्नंसी संदर्भातला प्रश्न विचारु नये म्हणून विद्याने काढता पाय घेतला असेलं. त्यामुळेचं विद्याने गुपचुप या पार्टीतून सटकण्याचाचं निर्णय घेतला, असं म्हटलं जातंय.