मुंबई : अभिनेता सैफ अली खानला सोमवारी २२ जानेवारीला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं आहे. त्याची हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या बातमीने त्याचे चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्याचे चाहते अभिनेत्याच्या तब्येतीची बऱ्याच वेळापासून वाट पाहत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार सैफ अली खानच्या गुडघ्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे.
सकाळी ८ च्या सुमारास सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खानही तिच्या पतीसोबत रुग्णालयात आहे. अद्याप समजू शकलेलं नाही की, सैफ अली खानच्या हाता पायाला फ्रॅक्चर कशामुळे झालंय. मिडीया रिपोर्टनुसार, सैफच्या गुडघ्याची सर्जरी लवकरच करण्यात येणार आहे. मात्र, सैफच्या टीमने अद्याप या वृत्तांचं कोणतही स्पष्टीकरण किंवा कोणतेही विधान जारी केलेलं नाही.
२०१२ साली झालं करीना-सैफचं लग्न
आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या महिन्यात करण जोहरच्या कॉफी विथ करण सीझन ८ मध्ये सैफने हजेरी लावली होती. जेव्हा रॉकी और रानी की प्रेम कहानी दिग्दर्शक करणने विचारंल होतं की, तुझ्यावर करिनाचा प्रभाव कसा पडला? काही वेळ विचार केल्यानंतर सैफ अली खानने उत्तर देत सांगितलं की, मला वेळ प्रबंधन, आरोग्य, व्यायाम, दिनचर्या, शिस्त, संयम या संदर्भात विचार करतो." सैफ आणि करिनाचं लग्न ऑक्टोबर २०१२ मध्ये झालं. करिना सैफला तैमूर आणि जेह नावाची दोन गोंडस मुलं आहेत.
अमृता सिंहसोबत केलं होतं सैफने पहिलं लग्न
करिना कपूरआधी सैफ अली खानचं लग्न अमृता सिंहसोबत झालं होतं. ज्यामुळे तिला दोन मुलं आहेत. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान. या दोघांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. 2004 मध्ये घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सेलिब्रिटी चॅट शोदरम्यान सैफने खुलासा केला होता की, लग्नानंतर त्याची आई शर्मिला टागौर त्याची आई नाराज होती. हम तूम स्टाररने सांगितलं की, त्याने शर्मिला आणि टाइगर पटौदी यांना सांगायच्या आधी लग्न केलं. ज्यानंतर हे ऐकून त्यांना खूप दु:ख झालं.