मुंबई : साडे सहाच्या ठोक्यावर अनेक घरामध्ये 'होम मिनिस्टर'चं टायटल सॉंग वाजतं. दार उघड बया म्हणतं घरात शिरलेले आदेश भाऊजी हळूहळू गप्पा रंगवत नकळत प्रेक्षकांच्या मनाचा ताबा कसा घेतात हे अनेकांना कळतही नाही.
सोशल मीडियावर मात्र 'होम मिनिस्टर'च्या गाण्यावर चक्क तरूणाईच्या गळ्यातला ताईत आणि प्रसिद्ध पॉपस्टार जस्टीन बिबर थिरकताना दिसत आहे. ही कमाल ‘चला मराठी परत यो बनवू’या थीमखाली व्हिडिओ पोस्ट करणार्या 'मराठी मेम्स' या फेसबुकपेजवरून शेअर करण्यात आला आहे.
हिंदी, इंग्लिशप्रमाणे मराठीमध्येही मेम्स बनवले जातात. काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील ' गाव गाता गजाली' या सिरीयलच्या गाण्याचेही अशाप्रकारे मेम्स बनवले होते. ते देखील तुफान व्हायरल झाले होते.