गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीच्या मुलीचा पहिला फोटो समोर

गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे तीन दिवसांपूर्वीच पालक झाले आहेत

Updated: Apr 5, 2022, 07:51 PM IST
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीच्या मुलीचा पहिला फोटो समोर title=

मुंबई : गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे तीन दिवसांपूर्वीच पालक झाले आहेत. नुकतीच देबिनाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी गुरमीत आणि देबिना त्यांच्या लहान परीसोबत दिसले. मात्र, त्यांच्या मुलीचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला नाही. पण जर तुम्ही देबिना आणि गुरमीतच्या मुलीच्या एका झलकची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा संपली आहे. या दोघांच्या मुलीचा पहिला फोटो समोर आला आहे.

या खास व्यक्तीकडून फोटो शेअर 
जीविता ओबेरॉय नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या फोटोत जिविताने केवळ मुलीला घेतलेलं दिसत नाही तर मुलीचा चेहराही दिसत आहे. हा फोटो शेअर करत जीविताने एक मोठी पोस्ट लिहिली आणि गुरमीत-देबिनाला टॅगही केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पोस्ट शेअर करत जीविता ओबेरॉयने इंस्टाग्रामवर लिहिलं की, 'माझी फिश आणि माझा स्टार बॉय आता पेरेंट्स बनले आहेत. हे सगळं एका सुंदर छोट्या परीच्या आगमनानंतर घडलं. मला अजूनही विश्वास बसत नाही की, तुम्ही दोघंही या सुंदर लहान मुलीचे पालक झाला आहात. या सुंदर प्रवासासाठी तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा, प्रेम, किस आणि पॉझिटीव्ह एनर्जीच्या शुभेच्छा. आमचं मन आनंदाने भरल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जीवी मावशी नेहमी बाळाची आवडती मावशी असेल. आय लव्ह यु.' याच बरोबर पोस्टच्या तिसऱ्या स्लाइडमध्ये तुम्ही बाळाचा चेहरा पाहू शकता.