58 व्या वाढदिवशी Om Shanti Om स्टाईल जंगी पार्टी देणार शाहरुख खान, हे कलाकार होणार सहभागी

2 नोव्हेंबर 2023 रोजी, शाहरुख खान त्याचा  58 वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख आजपर्यंतच्या सर्वात ग्रँण्ड बर्थडे पार्ट्यांपैकी एक आयोजित करण्यासाठी सज्ज आहे.

Updated: Oct 31, 2023, 08:08 PM IST
58 व्या वाढदिवशी Om Shanti Om स्टाईल जंगी पार्टी देणार शाहरुख खान, हे कलाकार होणार सहभागी

Shahrukh Khan : 2 नोव्हेंबर 2023 रोजी, शाहरुख खान त्याचा  58 वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख आजपर्यंतच्या सर्वात ग्रँण्ड बर्थडे पार्ट्यांपैकी एक आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान 2 नोव्हेंबर रोजी वांद्रे येथे एका भव्य बर्थडे पार्टीचं आयोजन करणार आहे आणि त्यासाठी भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील जवळजवळ प्रत्येक अभिनेता, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांना आमंत्रणं पाठवण्यात आलं आहे.

''कोरोना काळात शांत पद्धतीने वाढदिवस साजरा केल्यानंतर, 2023 हे शाहरुखसाठी पठाण आणि जवान या दोन जागतिक ब्लॉकबस्टरसह यशस्वी वर्ष ठरलं. भारतीय चित्रपट इंडस्ट्रीचे प्रतिनिधित्व करणार्‍या प्रत्येकासोबत त्याला त्याचा बर्थडे साजरा करायचा आहे आणि पुढील अनेक वर्षे हा वाढदिवस लक्षात राहिल अशी यादी तयार करण्यासाठी त्याची टीम सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 2023 मध्ये शाहरुख खानच्या वाढदिवशी त्याच्या सक्सेसचं सेलिब्रेशनसाठी हा इव्हेंट आयोजित करण्यात येणार आहे.'' असं जवळच्या एका सूत्राने सांगितलं आहे.

सलमान खान, करण जोहर, काजोल, दीपिका पदुकोण, राजकुमार हिरानी आणि सिद्धार्थ आनंद यासह अनेक दिग्गज या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे. ''ही नावे सर्वात वरच्या यादीत आहेत, कारण याशिवाय इतर अनेक सेलिब्रिटी वाढदिवसासाठी येणार आहेत. या पार्टीत स्टाईल, ग्लॅमर आणि मोठ्या एन्टरटेन्मेंटने भरलेली असणार आहे.''

विशेष म्हणजे 2 नोव्हेंबर हा शाहरुखसाठी खूप व्यस्त दिवस असणार आहे कारण चाहत्यांचे आणि हितचिंतकांकडून मिळालेलं प्रेम परत देण्यासाठी त्याने या दिवसासाठी खूप नियोजन केलं आहे. ''दिवसाची सुरुवात राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकीच्या टीझरने होईल. यानंतर फॅन इव्हेंट होणार आहे, जिथे शाहरुख जगाच्या विविध भागातून मुंबईत आलेल्या त्याच्या चाहत्यांसोबत हा टीझर लाईव्ह पाहणार आहे.

 खूप ग्रँण्ड अशी ही एक रात्र असण्याची अपेक्षा आहे. कारण पार्टीसाठी सेटअप आणि सजावट यावर देखील विशेष विचार केला गेला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ''ही एक भव्य पार्टी आहे आणि इंडस्ट्रीतील प्रत्येकजण किंग खानला भेटण्यासाठी आणि हा दिवस साजरा करण्यासाठी उत्सुक आहे.'' डंकी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट गुरुवारी, 21 डिसेंबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.