मुंबई : कधी नव्हे ते महाराष्ट्राचं राजकारण पेटलंय, महाराष्ट्राच्या राजकारणात एक संस्कृती आहे, कुणी कितीही राजकीय शत्रू असले, तरी खासगी आयुष्यात सर्वांनीच एकमेकांचा मान ठेवला आहे आणि मैत्रीचे संबंध जपले आहेत, पण मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला नजर लागल्यासारखं वातावरण आहे. कारण नेते एकमेकांवर जर जास्तच आक्रमक असल्याचं दिसून येत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातील हे संबंध असेल मैत्रीपूर्ण असावेत, विरोधाच्या ठिकाणी विरोध असावा, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असे संबंध कायम राहावेत, महाराष्ट्राची ही मैत्रीची राजकीय संस्कृती जपण्यासाठी झी मराठीने किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकलं आहे.
किचन कल्लाकार या मालिकेत भाजपाचे एकेकाळचे दिग्गज नेते आणि आताचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि राजकारणातले आताचे त्यांचे कट्टर विरोधक भाजपा नेते किरिट सोमय्या यांना विरोधासाठी नाही, तर मनातील गुज गोष्टी करण्यासाठी समोरासमोर आणलं आहे.
या कार्यक्रमात अनेक मौज मस्तीचे किस्से घडले आहेत, राजकारणाच्या ताणतणावातून आरोपांच्या पावसातून, हा विकाश, ही विश्रांती सर्वांनाच सुखावणारी आहे, विशेष म्हणजे या कार्यक्रमात एकनाथ खडसे आणि किरिट सोमय्या यांनी एकत्र येऊन 'ए दोस्ती हम नही तोडेंगे' हे गाणं म्हटलं आहे. पाहा हा व्हीडिओ...