बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी दिलीप कुमार यांनी शाहरुखला दिला होता सल्ला,'मला वाटतं...'

अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ शाहरुख खान बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. यामागे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी सांगितलेला मोलाचा सल्ला अतिशय महत्त्वाचं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 3, 2024, 12:46 PM IST
बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी दिलीप कुमार यांनी शाहरुखला दिला होता सल्ला,'मला वाटतं...' title=

Shah Rukh Khan - Dilip Kumar : दिलीप कुमार हे भारतीय सिनेमातील सुपस्टार्सपैकी एक म्हणून ओळखले जातात. दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांनी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहे. त्या स्टारडमला आताच्या कलाकारांमध्ये फक्त शाहरुख खानच मॅच करु शकतो. शाहरुख खान दिलीप कुमार यांच्या अतिशय जवळचा देखील होता. एकदा दिलीप कुमार यांनी शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये टिकण्यासाठी नेमकं काय करावं? याचा सल्ला दिला होता. 

दिलीप कुमारांनी दिला 'हा' सल्ला 

शाहरुख खानने दिलीप कुमार यांना एकदा विचारले होते, "सर, तुमचे सर्व चित्रपट इतके अजरामर आहेत, इतके दीर्घकाळ टिकणारे आणि इतके अद्भूत आहेत, त्यामागची नेमकी क्वालिटी काय?" दिलीप कुमार म्हणाले की,, "हे काही मोजकेच प्रश्न आहेत ज्यांना तुला सामोरं जावं लागेल."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Locarno Film Festival (@filmfestlocarno)

दिलीप कुमार पुढे म्हणाले होते, "मला वाटते की हे नशीब आहे. कदाचित खूप मेहनत, प्रामाणिकपणा, एकजूट, सातत्य या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचे महत्त्वाचं म्हणजे, कोणताही अभिनेता त्याने साकारलेल्या भूमिकेपेक्षा मोठा असूच शकत नाही. म्हणजे पात्र, कथा, पटकथा. कोणत्याही चांगल्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरीसाठी, तुमच्याकडे चांगली कथा, चांगली पात्रे असणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ हवा. 

शाहरुख खान वर्क फ्रंट

आज, शाहरुख खान केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात मोठा अभिनेता आणि सेलिब्रिटींपैकी एक आहे. गेल्या वर्षी या अभिनेत्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. पठाण आणि जवान ब्लॉकबस्टर होते, तर डंकीही सुपर-डुपर हिट ठरला. आता शाहरुख खान सुजॉय घोष दिग्दर्शित 'किंग' या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो आपली मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अभिनेत्याच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

काय आहे किंग सिनेमात? 

'किंग' एका डॉनच्या कथेवर आधारित आहे जो मुलीचा गुरू बनतो. या चित्रपटात शाहरुख खान एका डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे तर सुहाना खान त्याच्या शिष्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी रिपोर्ट्समध्ये अभिषेक बच्चन निगेटिव्ह भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आले होते. X वर अमिताभ बच्चन यांनी याला दुजोरा दिला. मुंज्या फेम अभय वर्माही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.