'तो कोणा दुसरीलाच डेट करत होता', दीपिकाचा रणवीरसोबतच्या पहिल्या डेटचा खुलासा

दीपिकाने शेअर केली ही गोष्ट 

'तो कोणा दुसरीलाच डेट करत होता', दीपिकाचा रणवीरसोबतच्या पहिल्या डेटचा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूडमधील सगळ्यात हॉट कपल्सबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात अगोदर नाव समोर येतं ते दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचं. दोघांनी जेव्हापासून लग्न केलंय तेव्हापासून हे दोघं कायम चर्चेत राहिले आहेत. 

दीपिका आणि रणवीरची पहिली ओळख ही अवॉर्ड फंक्शनमध्ये झाली होती. पण त्यावेळी दोघांना हे माहित नव्हतं की, पुढे जाऊन या दोघांच खास असं नात असणार आहे. 

दीपिका आणि रणवीरला खूप चांगल माहित होतं की, चाहते त्यांना किती प्रेम करतात. यामुळेच हे दोघं त्यांच्या खासगी आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करत असतात. 

नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कारादरम्यान दीपिकाने रणवीरसोबत तिची पहिली भेट कशी झाली होती हे सांगितलं. कधी ते दोघं एकमेकांचे एवढे खास बनले. 

दीपिकाने सांगितलं की, रणवीरची आणि तिची पहिली ओळख ही सिंगापुरच्या एका अवॉर्ड फक्शनमध्ये झाली. 

तर दुसरी भेट ही यशराज स्टुडिओत झाली होती. त्यावेळी रणवीर कुणा दुसऱ्या व्यक्तीला डेट करत होता. पण कोणतीही काळजी न करता तो माझ्याशी फ्लर्ट करत होता. 

मला या सगळ्या प्रसंगावर स्वतःलाच हसायला येत होतं. तेव्हा मी त्याला सहज बोलली की तू माझ्याशी फर्ल्ट करतोस. 

दीपिकाने खुलासा केला की, ते कायम डेटिंगच्या सुरूवातीला रेस्टॉरंटमध्ये जात असतं. पण दोघांचा खास क्षण म्हणजे 'गोलियों की रासलीला : रामलीला' या सिनेमाच्या शुटिंग वेळचा होता. 

जेव्हा दोघं संजय लीला भन्साळी यांच्या घरी जेवायला गेले होते तेव्हा जेवता जेवता माझ्या दाताला एक खाण्याचा तुकडा चिकटला.

तेव्हा रणवीर मला खूप विचित्र वाटावं असं वागत होता. तेव्हा रणवीर मला म्हणाला की, दातात खेकडा अडकला आहे. ते सगळे क्षण माझ्यासाठी खूप खास होते.