बॉलिवूडचे 'हे' 5 सिनेमा भारी पडणार साउथच्या RRR आणि KGF वर?

RRR आणि KGF Chapter 2 या चित्रपटांच्या कमाईने एक इतिहास रचला आहे.

Updated: May 4, 2022, 09:49 PM IST
बॉलिवूडचे 'हे' 5 सिनेमा भारी पडणार साउथच्या  RRR आणि KGF वर? title=

मुंबई : नुकतेच रिलीज झालेले साऊथच्या चित्रपटांनी काय धमाल केली आहे.  हे तुम्हाला माहीतच आहे. RRR आणि KGF Chapter 2 या चित्रपटांच्या कमाईने एक इतिहास रचला आहे. पण हे पाच हिंदी चित्रपट या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला तगडी टक्कर देतील का?

RRR आणि KGF Chapter 2 हे असे चित्रपट होते ज्यांनी कमाईच्या बाबतीत 1000 कोटींचा टप्पा ओलांडला. त्याचबरोबर KGFअजूनही चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. पण आता नजर बॉलिवूडच्या या 5 बिग बजेट चित्रपटांवर आहे.

Brahmastra : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मोठं बजेट खर्च करण्यात आल्याचं बोललं जात असून आता सर्वांचं लक्ष या चित्रपटाच्या कमाईकडे लागलं आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल असा अंदाज आधीच वर्तवला जात आहे. हा चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहे.

Dunky : डंकीमध्ये शाहरुख खान दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा खुद्द शाहरुख खानने केली होती. दुस-या इनिंगमध्ये त्याने चांगली स्क्रिप्ट निवडली असल्याने हा चित्रपट चमत्कारही करू शकतो आणि साऊथच्या चित्रपटांना मोठी टक्कर देऊ शकतो.

Laal Singh Chaddha : आमिर खान स्टारर लाल सिंग चड्ढा हा सिनेमा ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. आमिर खानने आपला बराच वेळ या चित्रपटासाठी खर्च केला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच यशाचे झेंडे रोवेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात करीना कपूर दिसणार आहे.

Pathan : शाहरुख खान त्याच्या करिअरची दुसरी इनिंग पठाणसोबत सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने या चित्रपटासाठी 100 कोटी रुपये घेतले आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या बजेटचा अंदाज तुम्ही स्वतःच लावू शकता. त्यामुळेच हा चित्रपट जबरदस्त हिट होईल अशी अपेक्षा आहे.

Tiger 3 : एक था टायगर आणि टायगर जिंदा है नंतर आता सलमान खान आणि कतरिना कैफ टायगर 3 घेऊन येत आहेत. लोकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ असून त्याच्या प्रदर्शनाचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटही चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.