मुंबई : कोणतीही व्यक्ती कितीही मोठ्या स्तरावर पोहोचली तरीही त्या व्यक्तीसाठी काही नाती ही कधीच बदलत नाहीत. या नात्यांमधील एक पैलू म्हमजै मैत्रीचा. कधीही, कोणत्याही संकटात अडकलेलं असताना मित्रमंडळीच हक्काने आठवतात. मुळात आठवण्यापेक्षा त्यांचं असणंही तितकच महत्त्वाचं असतं. बी- टाऊनच्या कलाकार मंडळींचेही असेच काही खास मित्र आहेत. अभिनेत्री आलिया भट्टची सोशल मीडिया पोस्ट पाहून याचा अंदाज येतच आहे. खास मैत्रीणीच्या लग्नसोहळ्याला हजेोरी लावण्साठी म्हणून आलिया नुकतीच दिल्लीला गेली होती. त्याच विवाहसोहळ्यातील तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आपल्या मैत्रिणीविषयी आणि बालपणीच्या आठवणींविषयी सांगताना भावूक झाल्याची दिसत आहे.
मैत्रीणीला तिचा साथीदार मिळाल्याचा आनंद आलिया व्यक्त करतच आहे. त्यासोबतच आपली मैत्रीण आहे तसंच तिचा स्वीकार करण्याबद्दल ती मैत्रीणीच्या पतीचे आभारही मानत आहे. देविका अडवानी हिच्या लग्नसोहळ्याच्या प्रत्येक कार्यक्रमात आलिया मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती. इतकच नव्हे, तर देविका या नावाने मैत्रिणीचा उल्लेख करण्यापेक्षा तिला बॉबी म्हणत आपलेपणाची जाणिव करुन देणारी आलिया पाहता अनेकांनाच आपल्या खास मित्रमैत्रीणींची आठवण झाल्यावाचून राहत नाही आहे.
मैत्रीणिविषयी आपल्या मनात असणारे भाव तिच्या लग्नाच्या निमित्ताने व्यक्त करत आणि तिच्या आयुष्यातील या सुरएख वळणावर भावनांना अश्रूंवाटे व्यक्त करणारी आलिया सगळ्यांचीच मनं पुन्हा एकदा जिंकून गेली आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओव्यतिरिक्त आलियानेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देविकाच्या लग्नातील फोटो पोस्ट करत ब्राईड्स मेड म्हणून तिने लग्नात किती कल्ला केला, यावरुन पडदा उचलला. त्यामुळे मैत्री असावी तर अशी... हेच आलिया आणि तिच्या गर्ल गँगचे फोटो पाहून लक्षात येत आहे.