कर्तिक आर्यनची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची जमीन, Future Plan ची जोरदार चर्चा

Kartik Aryan Buy Two New Properties: 2024च्या अखेरीस बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन झाला 'या' प्रॉपर्टींचा मालक; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची नवी संपत्ती

Updated: Jan 1, 2025, 12:26 PM IST
कर्तिक आर्यनची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची जमीन, Future Plan ची जोरदार चर्चा  title=

Kartik Aryan Buy Two New Properties: 2011 मधून 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलेला प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन हा आजच्या काळातील हँडसम बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. जवळपास तेरा वर्षांपूर्वी बॉलिवूड सिनेक्षेत्रात पाऊल टाकणारा हा अभिनेता आता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. आतापर्यंत कार्तिकने 22 हून अधिक चित्रपटात काम केलं आहे. मात्र कार्तिक साठी 2024 हे वर्ष यशाच्या दृष्टीने खूपच खास ठरलं आहे. याच वर्षातील 'भूल भूलैय्या 3' या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 240 कोटींहून अधिक कमाई करत मोठं यश संपादन केलं आहे. अनीस बजमी यांचा 150 कोटींच्या बजेट मध्ये बनलेला हा चित्रपट 240 हून अधिक गडगंज कमाई करत जगभरात हीट ठरला आहे. 

नुकतंच, कार्तिकने मुंबईत दोन प्रॉपर्टी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. वर्षाच्या अखेरीस कोट्यवधींच्या प्रॉपर्टींची खरेदी करुन कार्तिक हा कोटींच्या संपत्तीचा मालक झाला आहे. 'मिड डे'च्या वृत्तानुसार, कार्तिकने सध्या रिअल इस्टेट मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ निर्माते आनंद पंडित यांच्या सहाय्याने कार्तिक रिअल इस्टेट मध्ये नवीन सुरुवात करत आहे. कार्तिक मागील कित्येक आठवड्यात आनंद पंडित यांच्या सहकाऱ्यांसोबत अंधेरीतील दोन प्रॉपर्टीज बघत होता. या दोन्हींमध्ये रेसिडेंशियल आणि कमर्शियल स्पेसचा समावेश आहे. ही जागा जवळपास दोन हजार स्क्वेअर फूटची असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु, याबाबतीत कार्तिक आर्यन किंवा त्यांच्या टीमकडून काही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.

करण जोहरच्या चित्रपटांमध्ये करणार काम

या कोटींच्या संपत्तीचा मालक होण्याव्यतिरिक्त कार्तिक हा करण जोहरच्या चित्रपटात काम करणार असल्याची माहिती मिळाली आहे. कार्तिकने स्वत: करण जोहरसोबत या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. या चित्रपटाचे नाव 'तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मैरी' असं आहे. हा चित्रपटात रोमँटीक तर असणारच आहे त्यासोबतच कॉमेडी सीन्स सुद्धा पाहायला मिळतील. या चित्रपटासाठी कार्तिकने 50 करोडोंचं मानधन ठरवली असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. या चित्रपटाचे निर्देशक समीर विद्वंस असणार आहेत. या चित्रपटाला घेऊन कार्तिकच्या चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

 

रिअल इस्टेट मध्ये सुद्धा निर्माण करणार ओळख

कार्तिक आता फक्त बॉलिवूड मध्येच नाही तर रिअल इस्टेट मध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्याचा प्रॉपर्टी पोर्टफोलिओ वेगाने वाढताना दिसत आहे. आपल्या करिअरच्या सुरूवातीला ज्या वर्सोवा मध्ये तो पेइंग गेस्ट म्हणून राहत होता त्याच वर्सोवा इथे त्याचा एक अपार्टमेंट आहे. याव्यतिरिक्त जुहू मध्ये 17 कोटींपेक्षा अधिक किंमत असणारे दोन अपार्टमेंट्स आहेत त्यापैकी एक अपार्टमेंट त्याने भाड्यावर दिला आहे. कार्तिकचे ऑफिस वीरा देसाई मध्ये आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप सोडणारा कार्तिक हा आता फक्त चित्रपटांमध्येच नव्हे तर कोटींची संपत्ती खरेदी करत रिअल इस्टेट मध्ये सुद्धा आपली ओळख निर्माण करणार असल्याचं दिसत आहे.