Raid 2 Release Date : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाने काही दिवसांपूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशातच आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी अजय देवगन सज्ज झाला आहे. अजय देवगनकडे सध्या अनेक सिक्वेल चित्रपट आहेत. ज्यामध्ये सर्व चाहत्यांना आता अजय देवगनच्या 'रेड' या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रतीक्षा आहे. अजय देवगनचा 'रेड 2' हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. अजय देवगनने 'रेड 2' चित्रपटासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
अजय देवगनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'रेड 2' चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. हा पोस्टर शेअर करताना अजय देवगनने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, IRS अमेय पटनायक यांचे पुढील मिशन हे मे 2025 पासून सुरु होणार आहे. 'रेड 2' हा चित्रपट 1 मे 2025 रोजी रिलीज होणार आहे. 'रेड 2' चित्रपटाचा पहिला भाग हा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.
'रेड 2' चित्रपटात रितेश देशमुख दिसणार खलनायकाच्या भूमिकेत
अजय देवगनचा 'रेड 2' हा चित्रपट या वर्षी नाही तर 1 मे 2025 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगनसह अभिनेता रितेश देशमुख देखील खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता या चित्रपटासंदर्भातील उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात अजय देवगन हे इनकम टॅक्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याबरोबरच या चित्रपटात वाणी कपूर, सौरभ शुक्ला, वरुण शर्मा, अरबाज खान आणि इतर कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
अजय देवगनने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये नेमकं काय?
नुकताच अजय देवगनने त्याच्या इन्स्टाग्रामवर 'रेड 2' चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, IRS अमेय पटनायक यांचे पुढील मिशन हे मे 2025 पासून सुरु होणार आहे. 'रेड 2' हा चित्रपट 1 मे 2025 रोजी रिलीज होणार आहे. राज कुमार गुप्ता 'रेड 2' चित्रपट दिग्दर्शित केला आहे. राजकुमार गुप्ता यांच्यासह आदित्य बेळणेकर, रितेश शाह यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. रितेश शाहने 'पिंक' आणि 'एअरलिफ्ट'ची कथाही लिहिली आहे.