बीग बींना ही लागली पंढरीतल्या सावळ्या विठुरायाची ओढ

अमिताभ बच्चन यांचं मराठीतून ट्विट

Updated: Jul 23, 2018, 12:38 PM IST
बीग बींना ही लागली पंढरीतल्या सावळ्या विठुरायाची ओढ title=

पंढरपूर : आषाढीच्या भक्तियम वातावरणाची आणि पंढरीतल्या सावळ्या विठुरायाची ओढ अमिताभ बच्चन यांनाही लागली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी मराठीतून अभंग ट्विट केला आहे. बॉलिवूडचे शंहशाह अमिताभ यांनी ट्विट करुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज महाराष्ट्रभरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. गोदावरी नदीकाठावर असलेल्या मंदिरामध्ये देखील मोठ्या उत्साहात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तर कॉलेजरोड, पंचवटी, सातपूर अश्या विविध भागात असलेल्या विट्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. विठ्ठल नामाने महाराष्ट्र दुमदुमून गेला आहे.