सनीने का केला राजकारणात प्रवेश... अनिल शर्मांचा खुलासा

अनिल शर्मा यांनी सनी राजकारणात सक्रिय का झाला याबाबतीत खुलासा केला आहे. 

Updated: Apr 25, 2019, 12:05 PM IST
सनीने का केला राजकारणात प्रवेश... अनिल शर्मांचा खुलासा title=

मुंबई : बुधवारी म्हणजे २३ एप्रिल रोजी अभिनेता सनी देओलने राजकारणात उडी घेतली. संरक्षण मंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितित अभिनेता सनी देओलला उमेदवारी देण्यात आली आहे. सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूरहून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार आहे. त्याया निर्णयामूळे सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगत आहेत.

सनीचा 'गदर-एक प्रेम कहाणी' चित्रपट चांगलाच गाजला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सनीला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल शर्मा यांनी सनी राजकारणात सक्रिय का झाला याबाबतीत खुलासा केला आहे. 

सनी देओलने राजकारणात प्रवेश केल्यामूळे अनिल शर्मायांनी ट्विटरवर आपले मत मांडले आहे. 'लोकं विचारत आहेत की सनी देओल राजकारणात का आले... राजकारण हे खराब जाळं आहे. आणि सनी मोकळे मन असलेलं व्यक्तिमत्व आहे. राजकारण त्यांच्यासाठी नाही. पण प्रत्येक चांगला व्यक्ती असा विचार करेल तर राजकारण कधीच पांढरा होवू शकत नाही.' असे वक्तव्य अनिल शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले. 

निवडणुकीच्या या रणधूमाळीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची हेरा-फेरी होताना दिसत आहे. देशातील अनेक भागांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी कलाकारांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुक पार पडणार आहे. त्यापैकी ३ टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. तर बाकी ठिकाणी जोरदार प्रचार सभा पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये चौथ्या मतदान २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.