महागडी Handbag घेतल्यानं Alia का झाली ट्रोल? Gucci च्या सोहळ्यात नेमकं काय घडलं

Alia Bhatt Gets Trolled at Gucci Cruise 2024: आलिया भट्ट आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. सध्या सगळीकडेच (Alia Bhatt News) तिचीच चर्चा आहे. मेट गाला आणि एका लोकप्रिय इटालियन लक्झरीयस फॅशन ब्रॅण्ड ब्रॅण्ड एम्बॅसिडरपर्यंत आलियाच्या हटके स्टाईल्सची आणि फॅशनची (Alia Bhatt Fashion) चर्चा आहे. परंतु यावेळी मात्र ती गुचीच्या इव्हेंटला पोहचली आणि चक्क ट्रोलच झाली. 

गायत्री हसबनीस | Updated: May 17, 2023, 09:12 PM IST
महागडी Handbag घेतल्यानं Alia का झाली ट्रोल? Gucci च्या सोहळ्यात नेमकं काय घडलं  title=
Photo - Vogue India

Alia Bhatt Gets Trolled for Carrying Empty Handbag: अभिनेत्री आलिया भट्ट ही आपल्या फॅशन स्टाईलसाठी लोकप्रिय आहे. नुकतीच तिनं गुची या जगप्रसिद्ध ब्रॅण्डच्या गुची क्रुझ 2024 (Gucci Cruise 2024) या शोला साऊथ कोरियाच्या सेयूल येथे हजेरी लावली होती. यावेळी तिनं परिधान केलेल्या ड्रेसची सर्वत्र चर्चा झाली. परंतु तिच्या बॅगनं मात्र सर्वांचेच लक्ष वेधले. तिची बॅग ही महागड्या ब्रॅण्डची होती. परंतु ती बॅग पुर्णत: टान्सपंरट होती. त्यामुळे बॅगच्या आत काहीही ठेवलेले नाही हे सर्वांनाच स्पष्ट दिसत होते.

रिकामी बॅग (Alia Bhatt on Carrying Empty Bag) फॅशन म्हणून घेतली म्हणून आलियाला ट्रोलर्सनी ट्रोल केलं आहे. तिच्या या गेटअपवरून अनेकांनी खिल्लीही उडवली आहे. आलियानं यावेळी ब्लॅक कलरचा वनपीस घातला होता. 

यावेळी आलियाला मात्र नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. रिकामी बॅंगेत काही नाही तरी फॅशन म्हणून बॅंग घेऊन जायची ही कोणती फॅशन? असा सवाल अनेक ट्रोलर्स करताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वीच आलियानं एका इटॅलियन लक्झरी फॅशन हाऊसची ब्रॅण्ड एबॅसिडरही झाली आहे. त्यातून नुकतीच तिनं मेट गाला 2023 (Met Gala 2023) ला हजेरी लावली होती. त्यामुळे सध्या जागतिक फॅशन विश्वात आलिया ही सगळीकडेच चमकते आहे. परंतु नुकत्याच तिनं हजेरी लावलेल्या गुचीच्या कार्यक्रमात मात्र ती प्रचंड ट्रोल झाली आहे. 

हेही वाचा - उपराष्ट्रपतींनी दिलेला प्रेमाबद्दलचा 'तो' सल्ला परिणीतीच्या होणाऱ्या नवऱ्याने ऐकला; पाहा Video

गुची हा एक जगप्रसिद्ध ब्रॅण्ड (Gucci) आहे. यावेळी आलियानं यासाठी खास हजेरी लावली होती. यावेळी तिनं याच ब्रॅण्डची जॅकी 1961 ही ट्रान्सपरंट बॅग हातात कॅरी केली होती. तेव्हा आलियाच्या सौंदर्याचीही खूप प्रसंशा झाली. परंतु रिकामी बॅग कॅरी केल्यामुळे मात्र ती प्रचंड प्रमाणात ट्रोल झाली आहे. यावेळी ही बॅग पाहून नेटकरी म्हणाले की, बॅग रिकामी आहे तर घेऊन जायची गरजच (Alia Bhatt Trolled) काय आहे? तर दुसऱ्या एका युझरनं म्हटलं आहे की, बॅग रिकामी आहे तर त्यात काहीतरी तीन-चार गोष्टी तरी ठेव. 

आलिया ही यावेळी ट्रोल झाली असली तरी मात्र अनेकांनी तिची प्रसंशाही केली आहे. काहींनी म्हटलंय की, ही फार चांगली बाब आहे की जागतिक स्तरावर भारतीय कलाकरांना चांगलं व्यासपीठ मिळते आहे. तर काहींनी म्हटलंय की, ही फार चांगली गोष्ट आहे की, आपल्याकडील सेलिब्रेटी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नावं कमवतं आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'जी ले जरा' या तिच्या आगामी (Alia Bhatt Upcoming Films) चित्रपटातून दिसणार आहे.