अभिनेत्री प्राजक्ता बनली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गुडन्यूज

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिलीये.

Updated: Feb 10, 2022, 07:30 PM IST
अभिनेत्री प्राजक्ता बनली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गुडन्यूज title=

मुंबई : विनोदाचं टायमिंग, अफलातून संवादकौशल्य आणि अभिनय शैली या गोष्टींमुळे प्राजक्ता हनमघर कायम चर्चेत असते. 'शेजारी शेजारी पक्के शेजारी', 'फू बाई फू' आणि 'कॉमेडीची जीएसटी' या कार्यक्रमांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता हनमघर नुकतीच आई झाली आहे. प्राजक्ताने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिलीये.

प्राजक्ताच्या विनोदी अंदाजाने आणि अनोख्या अभिनय कौशल्याने आजवर प्रेक्षकांचं बरंच मनोरंजन केलं आहे. प्राजक्ताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. २०१७ मध्ये रजत ढाळेसोबत प्राजक्ताने लग्न केलं होतं. रजत मुळचा धुळ्याचा असून, सध्याच्या घडीला पुण्यात एका प्रतिष्ठित कॉर्पोरेट कंपनीत जॉबला आहे.

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेतील प्राजक्ताची भूमिका विशेष गाजली होती. नऊवारी साडीपासून ते अगदी सर्वसामान्य महिलेच्या भूमिकेतही ती प्रभावीपणे आपली कला सादर करत आहे. प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंज करणाऱ्या प्राजक्ताच्या पोस्टवर चाहते भरभरुन प्रेम देत आहेत. अभिनेत्रीचं अभिनंदन करत चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधी अभिनेत्रीने डोहाळे जेवणाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोवरही चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आणि तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं