मुंबई : अभिनेता विवेक यांना 16 एप्रिल रोजी म्हणजे आज खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागल्यामुळे तात्काळ त्यांना SIMS रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वाडापलानी येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं असून हृदय विकाराच्या झटक्याने त्यांनी तब्बेत नाजूक असल्याचं म्हटलं जातं आहे. (Actor Vivek Suffers a Heart Attack, Admitted to Hospital ) विवेक यांच्यावर खासगी रूग्णालयातील डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आले.
गुरूवारी 59 वर्षांचे अभिनेता विवेक यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांनी कोरोनापासून रक्षण करण्यासाठी स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं. याकरता मास्क घालणे, सतत हात धुवत राहते आणि योग्य ते अंतर राखणे या गोष्टी महत्वाचं असल्याचं देखील सांगितलं. स्वतःला कोरोनापासून वाचायचं असेल तर लस घेणं गरजेचं असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.
Praying for a speedy recovery dear@Actor_Vivek sir‼️#vivek pic.twitter.com/3q7EmMdgqK
— Prasanna.P (@follow_prasanna) April 16, 2021
विवेक हे सोशल मीडियावरील ट्विटर प्लॅटफॉर्मवर कायम ऍक्टिव असतात. त्यांनी लस घेतल्यावर डॉक्टरांचे आभार देखील मानले होते.
அரசு மருத்துவமனையில் கொரோனா தடுப்பூசி போட்டது ஏன்? - நடிகர் விவேக் விளக்கம்@Actor_Vivek | #Vivek | #CoronaVaccine | #COVID19 https://t.co/q6uUrE27rj
— Thanthi TV (@ThanthiTV) April 15, 2021
विवेक यांनी धरला प्रभू या सिनेमात शेवटचं काम केलं आहे. 2012 मध्ये हिंदी सिनेमा विक्की डोनरचा तामिळ रिमेक 'धरला प्रभू' हा सिनेमा आहे. त्याचप्रमाणे विवेक हे कमल हसनच्या 'इंडियन 2' सिनेमाचे देखील भाग आहेत.