Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावर या मालिकेचे सर्वात जास्त चाहते आहेत. टप्पू, सोनू ते बबिता जी, दयाबेन ते जेठालाल, सर्वजण अजूनही या शोमधील लोकांच्या आवडत्या पात्रांपैकी एक आहेत. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेला 16 वर्षांहून अधिक काळ झाला आहे.
16 वर्षांत या मालिकेत अनेक कलाकार आले आणि गेले. या मालिकेसंदर्भात काही अफवा देखील पसरल्या आहेत. ज्यामुळे चाहत्यांची मनं तुटू शकतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी या मालिकेतून 'सोढ़ी' यांनी निरोप घेतला आणि आता या मालिकेच्या सुरुवातीपासूनच लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या आणखी एका कलाकाराने या मालिकेचा निरोप घेतला आहे.
'अब्दुल' गेल्या 4 एपिसोड्समधून गायब
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील 'अब्दुल'ची भूमिका साकारणारा अभिनेता शरद सांकला याने ही मालिका सोडल्याची माहिती समोर येत आहे. मालिकेच्या सध्याच्या काही भागांमध्ये त्याची अनुपस्थितीबद्दल अफवा पसरु लागल्या आहेत. मात्र, अद्याप यावर निर्मात्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रिपोर्टनुसार, काही कारणांमुळे अभिनेत्याने मे 2024 मध्ये या मालिकेला अलविदा केले. मात्र, त्यामागचे कारण काय आहे, याबाबत अद्याप माहिती नाही. 16 वर्षांपूर्वी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाल्यापासून शरद या मालिकेचा एक भाग होता. मात्र, गेल्या 4 एपिसोडमधून तो बेपत्ता असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात शंका वाढली आहे.
गोकुळधाम सोसायटी घेतेय अब्दुलचा शोध
नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये गोकुळधाम सोसायटीतील सर्व लोक अत्यंत चिंतेत असून ते अब्दुलचा शोध घेत आहेत. टप्पूसेनाही अब्दुलच्या घरी गेली आहे. पण अब्दुलच्या शोधाची बातमी अजूनही मिळत नाहीये. नंतर एक व्यक्ती येऊन सांगतो की अब्दुलने आपल्याकडून 50 हजार रुपये कर्ज घेतले आहे. परंतु ते अद्याप परत केले नाही. हे ऐकल्यानंतर तो अस्वस्थ होतो आणि पोलिसांची मदत मागतो.
अब्दुल खरोखर गायब झाला की मालिका सोडली?
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून अब्दुल स्वत: च सोसायटी सोडून गेला आहे की तो खरोखर बेपत्ता झाला आहे हे येणाऱ्या भागांमध्ये बघावे लागणार आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील शंका आहे. कारण जेव्हा 'गोली' म्हणजेच कुश शाहने मालिके सोडली, त्यावेळीही असेच काहीसे दाखवण्यात आले होते.