दयाशंकर मिश्र,झी मीडिया : पहिल्या दृष्टीक्षेपात आपल्याला काय पाहिजे हे सांगणे किती सोपे वाटते ना... कारण आपल्याला वाटते की सर्व किती स्पष्ट आहे. पण काश! हे इतकं सरळ असते तर... आपल्यातील किती जणांना माहिती आहे की त्यांना काय पाहिजे आहे. बहुतांशी लोक गोंधळात असतात की त्यांना काय पाहिजे.
ज्यांना स्पष्ट माहिती की आपल्याला काय पाहिजे त्यांच्या जीवनात तणाव कमी असतो.
आज ज्या गतीने भारतासह जगात तणाव वाढत आहे, त्याचे कारण हेच आहे की आपल्याला जे काही हवं आहे त्यात स्पष्टता नाही. आपल्याला हवं काही असतं आणि आपण करत काही वेगळंच असतो. जगतो काही वेगळंच... आणि आपल्या हृदयात धडकतं काही वेगळंच... काही दिवसांपासून कोलकत्यात आहे....
आज सकाळी मुंबईला जाण्यापूर्वी एअरपोर्टवर माझी ओळख एका युवा लेखकाशी झाली. मध्यवर्गीय कुटुंबातील हा युवक मला त्याच्या स्वप्नांच्या बाबतीत जितका स्पष्ट वाटला, तितके आपल्यातील खूपच कमी लोक असतात..
वल्लभ चौधरी या युवकाचे नाव... त्याने काही दिवसांपूर्वी एका मल्टीनॅशनल कंपनीतील आपली गरजेपूर्ती पण आतापर्यंतची नियमित पगाराची नोकरी सोडली होती. त्यांच्याकडे नियमित पगाराची सध्या कोणतीच नोकरी नव्हती. त्याला आपल्या कुटुंबाकडूनही कोणत्या प्रकारची मदत मिळत नव्हती. त्यामुळे मी चिंता व्यक्त करत विचारले की तो आता कुटुंबाचे पालनपोषण कसे करणार... त्यानंतर जे त्याने सांगितले त्याच्या आत्मविश्वासाची आपल्या सगळ्यांना गरज आहे.
आपल्याला सर्व पाहिजे असते. नाव, प्रतिष्ठा आणि मनाजोगतं काम पण... पण यासाठी वेगवेगळी किंमत चुकवावी लागते. ते मूल्य कोणाला द्यायचे नसते. त्यामुळे कोणतेही मूल्य दिल्याशिवाय आपण कधीही आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. आपल्या इच्छा आणि आपल्या प्रयत्नात नेहमीच कोणताही समन्वय नसतो.
हे काही प्रमाणात असेच आहे. समजा एक युवा क्रिकेटर बनू इच्छीत आहे. पण तो क्रिकेटच्या मैदानात जाऊ इच्छित नाही. कारण ते मैदान त्याच्या घरापासून दूर आहे. तो सकाळी लवकर उठू शकत नाही, त्याला झोपणे खूप आवडते. त्यामुळे त्याचे स्वप्न काही आहे आणि तो वागतो वेगळंच आहे. काही दिवसांनंतर तो नोकरी करायला लागतो कारण जीवनात तो रिस्क घेऊ इच्छित नाही. त्याला वाटते की कोण जाणे क्रिकेटर बनू शकतो की नाही. तसे आपल्या माहिती आहे की एक क्रिकेटर बनणे खूप अवघड गोष्ट आहे... आहे की नाही...
बहुतांशी भारतीयांचा आपल्या इच्छांच्या बाबतीत पाहण्याचा दृष्टीकोन असाच आहे. वरवर लोक आपल्या जीवनात इतक्या बहाण्यांसह वावरत असतो. या दरम्यान कोणी तर्क लावला तर त्यांच्या भावना दुखावल्या जातात.
वल्लभने सांगितले की, तो आठ वर्षांपासून एक अशी नोकरी करत होता, जिथं वाचण्याचा लिहण्याची संधी खूप कमी आहे. त्या ठिकाणी कोणी या गोष्टीवर बोलण्यास तयार होत नसे. वल्लभला तर जग पाहण्याची इच्छा असते. पुस्तक मेळावे, वाचन, प्रवास आणि आपल्या लिखाणाला वेळ देण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे एक दिवशी त्याच्या मित्राने त्याला सांगितले की मी एक अशी नोकरी मिळवून देणार त्यात या नोकरीच्या अर्धे पैसे असतील पण काम वल्लभच्या पसंतीचे असणार आहे. वल्लभने लगेच हो म्हटले. कुटुंबातून काही प्रमाणात समर्थन तर काही धास्तीनंतर वल्लभने आपला रस्ता पकडला.
त्याने सांगितले की मी आता ३० वर्षांचा आहे. आता आपल्या स्वप्नांच्या मागे पळणार नाही तर कधीच पळू शकणार नाही. त्याने सांगितले की जुन्या नोकरीतून मिळालेल्या पैशातून किमान दोन वर्षांचा फंड शिल्लक आहे. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तो पुरेसा आहे.
त्यामुळे तो निघाला आहे स्वतःवर जुगार खेळायला. दोन वर्ष या युवकाने संपूर्ण इमानदारीने आपल्या जीवनाला देण्याचे ठरविले आहे. वल्लभने आपल्या गरजा अत्यंत कमी करून टाकल्या आहेत. तो दुसऱ्याप्रमाणे दिसण्या ऐवजी आपल्या इच्छेप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करण्याचा तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवत आहे.
घर- परिवार एकदम साधारण आर्थिक स्थितीचे असताना सुद्धा त्याच्या विचारात कोणतीही तक्रार नाही. तो प्रयत्नांची सखोलता आणि निष्ठा यांच्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करतो आहे.
दुसरीकडे मोठ्या संख्येत युवकांमध्ये आपली सुप्त इच्छा स्पष्ट होत नाही, त्यावर आकर्षणाचे जाळे निर्माण होत राहील. मी मोठ्या संख्येत अशा व्यक्तींना विशेषतः युवकांना भेटतो जे आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. पण जसे तुम्ही काम सांगतात, तेव्हा ते आपल्या कंफर्ट झोन मध्ये जातात. नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला नेहमी जे काही मिळाले आहे ते कफर्ट झोनमधून बाहेर पडून मिळाले आहे. जो पर्यंत आपण वल्लभ प्रमाणे स्वप्नांच्या मागे पळत नाही. तो पर्यंत बात नही बनने वाली...
(लेखक झी न्यूजमध्ये डिजिटल एडीटर आहेत)
https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये नोंदवा : https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)