मुंबई: जंगल सफारी असो किंवा झूमध्ये प्राण्यांसोबत फोटो काढणं असो या क्षणाचा आनंद प्रत्येक जण घेण्यासाठी धडपडतो. मात्र काहीवेळा प्राणी किंवा पक्षी काहीवेळा नकळत तर रागाने हल्ला करतात. काही दिवसांपूर्वी विनामास्क पार्कमध्ये गेलेल्या महिलेसोबत एका पक्षाने तिचा गळ्यावरचा मास्क ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता जंगल सफारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
एक महिला जिराफचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना ते जिराफने पाहिलं आणि त्याने महिलाचा पाठलाग करायला सुरुवात केली. जिराफ संतापलेला यामध्ये व्हिडीओमध्ये दिसत आहे. जिराफ या महिलेवर हल्ला करण्यासाठी येत आहे. शांतरणे पेटपूजा करणाऱ्या जिराफला डिस्टर्ब केल्यानं तो चिडल्याचं दिसत आहे.
आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जिराफला एक लहान मुलगा खायला देतो. जिराफ त्याच्या हातून खाणं ओढून घेताना तोही वर ओढला जातो आणि पालक खूप घाबरतात.
अनेकदा सफारी दरम्यान किॆंवा झू मध्ये प्राण्यांना त्रास न देण्याचं आवाहन करूनही बऱ्याच लोक ऐकत नाहीत आणि त्याचे परिणाम असे होत असतात हे वेळोवेळी पाहायला मिळतं.