अँकर बातम्या देत असताना अचानक आला तिचा १० महिन्याचा मुलगा अन्...

 अँकर बातम्या देत होती आणि अचानक आला मुलगा 

Updated: Jan 30, 2021, 10:18 PM IST
अँकर बातम्या देत असताना अचानक आला तिचा १० महिन्याचा मुलगा अन्...

मुंबई : परदेशी न्यूज चॅनेलमध्ये एका अँकरची बुलेटीन सुरू असताना धम्माल उडाली. अँकर बातम्या देत होती आणि अचानक तिचा दहा महिन्याचा मुलगा तिथे आला आणि चॅनेलच्या ऑफीसमध्ये एकच हशा उडाला. मुलाला तिथे पाहून बातम्या देण्याचं न थांबवता, आपल्या मुलाला कडेवर घेऊन, आपल्या बातम्या सुरूच ठेवल्या. या अँकरचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मिलियन लोकांनी पाहिला आहे.

अँकर लेस्ली लोपेझ कॅलिफोर्नियामधील तिच्या घरी हवामानाचा अहवाल सांगत होती. ज्या दरम्यान तिचा 10 महिन्यांचा मुलगा नोलन तिच्याकडे येतो. लेस्ली नंतर मुलाला उचलते आणि तिचा हवामानाचा अहवाल देखील पूर्ण करते.