Know the meaning of Husband : एखादी विवाहित स्त्री जेव्हा तिच्या पतीची ओळख करून देते तेव्हा सहसा ती त्याचं नाव घेण्याआधी Husband चा उल्लेख करते. पण, खरंच या शब्दाचा अर्थ 'पती' इतकाच आहे? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर याच शब्दामुळं शाब्दिक बाचाबाची सुरु असल्याचं दिसत आहे. त्यामुळं आता हसबंडचा नेमका अर्थ जाणून घ्यायलाच हवा. (what is the meaning of a word Husband know more )
सध्या म्हणे महिला त्यांच्या पतींना हसबंड म्हणन संबोधू इच्छित नाहीत. कारण या शब्दामुळं त्यांना अडचणी येऊ लागल्या आहेत. अमेरिकेत सुरु असणाऱ्या फेमिनिस्ट आंदोलनातून या नकारघंटेची सुरुवात झाली. एका प्रसिद्ध परदेशी माध्यम समूहाकडे अमेरिकन नागरिक ऑड्रा फिगेराल्ड (Audra Fitzgerald) यांनी आपलं मत नोंदवलं होतं, जिथं त्यांनी आपण पतीला हसबंड नव्हे WER म्हणतो. याचाही अर्थ पती असाच होतो.
Husband हा एक लॅटिन शब्द आहे. यामध्ये Hus म्हणजे घर आणि Band म्हणजे जमीन किंवा एखादा भूखंड किंवा संपत्ती. थोडक्यात या शब्दाचा अर्थ होतो घराचा मालक. या शब्दाची अगदीच प्राथमिक सुरुवात hūsbōndi पासून झाली. याचाही अर्थ घरमालक, असाच होतो. हा शब्द पुढे Husbandry शी जोडला जाऊ लागला. ज्याचा अर्थ पक्षी, पशू, शेत यांची राखण करणं असाही गृहित धरला गेला. थोडक्यात अनेकांनीच हा शब्द पुरुषी मानसिकतेला खतपाणी घालणारा असल्याचं म्हणत त्याचा विरोध केला.
जिथं महिलांना सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं स्थान दिलं जातं, तिथंच या एका शब्दानं आता नवं वादंग माजलं आहे. पतीच्या नावाचा हा असा अर्थ काही प्रमाणात महिला वर्गाचा रोष ओढवून घेताना दिसत आहे.
वादाला तोंड फोडणाऱ्या ऑड्रा फिगेराल्ड (Audra Fitzgerald) यांच्याविषयी थोडं...
हसबंड या शब्दाला विरोध करण्यामागचं कारण म्हणजे हा अतिशय misogynist शब्द आहे. यातून सतत पुरुषी मानसिकता झळकते असा त्यांचा विचार. ऑड्रा यांनी असं वक्तव्य करताच अनेकांनीच त्यावर व्यक्त होण्यास सुरुवात केली. आता तुम्हीच ठरवा, योग्य कोण? आणि तुम्ही कोणता शब्द वापरणार....?