Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत OnlyFans ची कंटेंट क्रिएटर बोनी ब्लू (Bonnie Blue) एका फूड शॉपमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्याला अप्रत्यक्षपणे आपल्यासह शारिरीक संबंध ठेवण्याची ऑफर देताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका होत आहे. बोनी ब्लूने याआधी आपण 158 विद्यार्थ्यांसह झोपले असल्याचा दावा केला आहे. व्हिडीओत ती रेस्तराँमध्ये गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्याला 'तू मेन्यूत आहेस का?' अशी विचारणा करताना दिसत आहे.
“मला आश्चर्य वाटत आहे, पण मला मेन्यूत कुठेही दिसलं नाही. मला 5 तरुण कुठे मिळतील?," असं बोनी काऊंटरवर जाऊन कर्मचाऱ्याला विचारते. यानंतर तो तरुण काहीसा गोंधळतो. तो 'काय' असं विचारत पुन्हा एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. यानंतर ती पुढे म्हणते की, "पाच तरुण. मला माहिती पण तुमच्याकडे स्पेशल रुम किंवा मग मला मागे नेऊ शकत असाल तर".
यानंतर तो कर्मचारी तरुण तिला स्पष्ट नकार देत सांगतो की, 'नाही, मला असं काही होताना दिसत नाही'. यानंतर ती विचारते, "तुझ्या शिफ्टचं काय? म्हणजे मला तुला चांगलं रेटिंग द्यायचं आहे". त्यावर तरुण उत्तर देतो की, "मी ख्रिश्चन आहे आणि लग्न होईपर्यंत वाट पाहणार आहे". पण त्यांनतरही बोनी थांबत नाही. "मी फक्त मेन्यूत काय आहे असं विचारत आहे इतकंच, तू तयार आहेस का?" अशी विचारणा करते.
DEVELOPING: This Onlyfans creator who went viral for sleeping 950 men in 24 hours named ‘Bonnie Blue’ was spotted trying to pressure a Christian man into having sex with her on the restaurant’s property
Five Guys Employee : "No, I'm a Christian man" pic.twitter.com/ECnP0RPzTU
— Dom Lucre | Breaker of Narratives (@dom_lucre) January 7, 2025
हा संवाद ऐकल्यानंतर नेटकरी गोंधळात पडले आहेत. अनेकांनी तरुणाने दिलेल्या उत्तराबद्दल त्याचं कौतुक केलं आहे. एका व्यक्तीने लिहिले, “हा एक मानसिक आजार आहे.” एकाने हे अतिशय घाणेरडं असल्याचं म्हटलं आहे. तसंच एकाने आपली साईट विकण्यासाठी रेस्तराँचा वापर केल्याबद्दल तिच्यावर यांनी खटला दाखल करावा.
याआधी ड्रीम ऑन विथ लॉटी मॉस पॉडकास्टवर, ब्लूने आपण फक्त 2 आठवड्यात 158 विद्यार्थ्यांसह शारिरीक संबंध ठेवल्याचा खुलासा केला होता. आपल्याला वडील आणि पतींसह शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे.
तिने दावा केला की, तिने यूके, यूएसए आणि ऑस्ट्रेलियामधील काही ठिकाणांना भेटी दिल्या आणि लाईव्ह लोकेशन शेअर करत लोकांना आमंत्रित केलं, जेणेकरुन त्यांना शारिरीक आनंद देता येऊ शकेल. तिच्या म्हणण्यानुसार, तिन्ही ठिकाणी मोठ्या रांगा होत्या आणि तिचा “विद्यार्थ्यांशी” संवाद आठ तास चालला. तिने उघड केले की तिला “जागतिक विक्रम” मोडायचा आहे, जो तिच्या मते, एका दिवसात 948 लोक आहेत.