Viral Video : कधीकधी माणसांच्या गराड्यात राहण्याची सवय असली की, अनेकदा एकांताचीही भीती वाटू लागते. एकटेपणा क्वचितप्रसंगी हवाहवासा वाटला तरीही बऱ्याचदा हाच एकटेपणा खायला येतो आणि त्याचा मानसिक, शारीरिक परिणाम स्पष्टपणे दिसू लागतो. फक्त मनुष्य प्रजातीमध्येच हा गुण नसून, प्राणीमात्रांमध्येही हाच स्वभाव पाहायला मिळतो.
नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ हेच दाखवून देत आहे. तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल, पण जपानमधील मस्त्यालयात घडलेला हा प्रकार पाहून साऱ्या जगानं आश्चर्याची भावना व्यक्त केली आहे. कारण, इथं चक्क एका माणसाळलेल्या माशासाठी मस्त्यालयात अशी काही व्यवस्था करण्यात आली की पाहणाऱ्यांनाही त्याचं कौतुक वाटलं.
व्हायरल होणारी ही गोष्ट आहे जपानमधील कायक्योकान मस्त्यालयातील. जिथं एक सनफिश इतका एकटा पडला होता की, त्याला मानसांची ये- जा पाहण्याची सवय झाल्यामुळं मस्त्यालयाच्याच वतीनं काहीशी तशीच व्यवस्था करण्यात आली. हे मत्स्यालय नुतनीकरणासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आल्यामुळं तिथं मासे पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जवळपास कमी आणि नंतर बंदच झाली.
हे सर्व सुरु असतानाच सुरुवातीला या माशाच्या पचनक्रियेवर याचा परिणाम होतोय असं तिथं काम करणाऱ्यांना वाटू लागलं. एक वेळ अशीही आली जिथं या माशानं खाणं सोडलं. यावरूनच हा मासा एकटा पडला असावा असा तर्क या कर्मचाऱ्यांनी लावला आणि इथंच एक शक्कल लढवण्यात आली.
When staff at the Kaikyokan aquarium in Japan noticed that their sunfish was looking lonely and had even stopped eating, they knew they had to do something to help.
Lonely sunfish in Japan gets cardboard human friends#news pic.twitter.com/Q4lXFRR0CM
— (@p_communityhub) January 20, 2025
मासा एकटा पडल्यामुळं येथील कर्मचाऱ्यांनी तिथं माणसांची प्रतिकृती असणारे काही मुखवटे आणि पुतळे उभे केले आणि आश्चर्य म्हणजे याचा परिणामही दिसू लागला. माशाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सोशल मीडियावर सध्या जपानमधील या घटनेची बरीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.