लेकीचं सौंदर्य पाहून पत्नीवर आला संशय; पतीने केलं DNA टेस्ट अन् मग वाढदिवशी झाला मोठा खुलासा

Trending News : आजकाल डीएनए चाचणी खूप सामान्य झाली आहे, मात्र लोक सत्य जाणून घेण्यासाठी याचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेकवेळा अशी माहिती लोकांच्या हाती येते. ज्याची कोणालाच अपेक्षा नसते. एका वडिलांनी आपल्या मुलीची डीएनए चाचणी केली तेव्हा धक्कादायक निकाल समोर आला. 

नेहा चौधरी | Updated: Nov 13, 2024, 01:52 PM IST
लेकीचं सौंदर्य पाहून पत्नीवर आला संशय; पतीने केलं DNA टेस्ट अन् मग वाढदिवशी झाला मोठा खुलासा title=

Vietnam Man Dna Test : असं म्हणतात की शंका ही खूप वाईट गोष्ट आहे आणि जर पती पत्नीच्या नातात संशय आला की त्यांचा सुखी संसार उद्ध्वस्त होतो. या संशायाचा किडा एकदा काय डोक्यात घुसला की, सत्य समोर येईपर्यंत तो शांत होत नाही. सुखी आणि चांगलं नातं यातून बिघडतं. या संशयातून कसे संसार उद्ध्वस्त होतात यावर अनेक चित्रपट, मालिका आपण पाहिल्या आहेत. असाच एक किस्सा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. जिथे लेकीचं सौंदर्य पाहून एका पतीला त्याच्या पत्नीवर संशय आला म्हणून त्याने सत्य जाणून घेण्यासाठी डीएनए टेस्ट केली. त्यानंतर जे काही समोर आलं त्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. 

हे प्रकरण व्हिएतनामचं असून, इथे एका व्यक्तीला आपल्या मुलीचे सौंदर्य पाहून डीएनए चाचणी करण्याच डोक्यात आलं. या गोष्टीने त्याच्या मनात संशयाचे बीज पेरले आणि त्याची शंका दूर करण्यासाठी वडिलांनी डीएनए चाचणीची मदत घेतली. ज्यानंतर असा निकाल समोर आला. हे पाहून तो माणूस स्तब्ध झाला अन् मग...

वाढदिवशी आलं सत्य समोर!

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही मुलगी लहानपणापासूनच खूप सुंदर होती आणि तो माणूस तितकासा देखणा नव्हता, पण जसजशी ती मोठी होत गेली, तसतसं तिच्या वडिलांना संशय येऊ लागला की, ही मुलगी आपली आहे की नाही. वडिलांचा संशय अधिक गडद होत गेला. जेव्हा त्याने आपल्या पत्नीशी याबद्दल चर्चा केली तेव्हा ती त्याच्यावर खूप चिडली आणि ती चाचणी घेण्यास तयार नव्हती. यानंतर तीही मुलीसह घरातून निघून गेली. तिच्या नवऱ्याच्या बोलण्याने तिला इतका राग आला की, ती ज्या शहरात गेली तिथे मुलीला शाळेत घातलं. 

त्यांचं असं झालं की, वडिलांना मुलीच्या जन्मतारखेबद्दल काहीच कळू शकलं नाही. मात्र, एके दिवशी पती-पत्नीमध्ये समेट झाला आणि ते घरी परतले. एके दिवशी शाळा बदलत असताना त्या मुलीची नवीन शाळेतल्या एका मुलीशी मैत्री झाली. मजेशीर म्हणजे या दोघांचा जन्म एकाच दिवशी आणि एकाच रुग्णालयात झाला होता. तिने नवीन मित्राला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं. त्या नवीन मित्राचा चेहरा वाढदिवसाच्या मुलीच्या वडिलांशी अगदी जुळत होता. त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत चर्चा केली.

त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी चाचणी करण्याचा विचार केला, त्यानंतर डीएनए चाचणी केली असता ती मुलगी त्या कुटुंबाची आणि त्या कुटुंबातील मुलगा या लोकांचा असल्याच समोर आला. रुग्णालयाचा हलगर्जीपणामुळे मुलांची बदला बदल झाली होती. दरम्यान या घटनेनंतर, दोन्ही कुटुंबांमधील संबंध वाढले कारण त्यांना त्यांच्या मुलींनी मोठे झाल्यानंतर कुठे राहायचे हे ठरवायचे आहे. मात्र, दोन्ही कुटुंबांनी कायदेशीर कारवाई केली की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.