कठोर मनाचा सैनिक नाजूक नात्यासाठी ढसाढसा रडला....अखेर बायको-मुलीपेक्षा सैनिकासाठी देशच मोठा...

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये युक्रेनचे सैनिक युद्धावर जाण्यापूर्वी त्यांच्या पत्नींना निरोप घेताना दिसत आहेत. 

Updated: Feb 25, 2022, 07:35 PM IST
कठोर मनाचा सैनिक नाजूक नात्यासाठी ढसाढसा रडला....अखेर बायको-मुलीपेक्षा सैनिकासाठी देशच मोठा... title=

मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या विनाशकारी युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. कारण या सगळ्या परिणाम इतर देशांवर देखील या ना कारणामुळे होणार आहे. प्रत्येकजण रशियाला युद्ध संपवण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या यद्धाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जे आपल्याला या भयाण परिस्थितीची जाणीव करुन देत आहे.

 काही व्हिडिओंमध्ये रशियन हल्ल्यानंतरचे भयानक दृश्य दिसत आहे, तर काहींमध्ये हल्ल्याच्या भीतीने लोक सुरक्षित स्थळी धावताना दिसत आहेत.

अशा स्थितीत सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, तो खूपच भावूक आहे. व्हिडीओमध्ये युक्रेनचे सैनिक युद्धावर जाण्यापूर्वी त्यांच्या पत्नींना आणि मुलांची भेट घेत आहेत. कदाचित यांची ती शेवटी भेट देखील असू शकते.

कारण तेथे इतकी भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे की, कोणी जिवंत राहिल याची शक्यता फारच कमी आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये युक्रेनचे सैनिक युद्धावर जाण्यापूर्वी त्यांच्या पत्नींना निरोप घेताना दिसत आहेत. बायकांच्या डोळ्यात पाणी आहे आणि मनात पतीला गमावण्याची भीती, त्यामुळे जड अंतकरणाने या महिलांना आणि मुलांना आपल्या वडिलांना आणि नवऱ्याला निरोप द्यावा लागत आहे.

यादरम्यान एका सैनिकाची पत्नी पतीच्या दुराव्याच्या विचाराने ढसाढसा रडत आहे. तिला स्वत:ला सावरणं देखील कठीण होऊन बसलं आहे. हे एक अतिशय भावनिक दृश्य आहे.

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर, प्रत्येकजण त्यांच्या खात्यावर हा अत्यंत भावनिक व्हिडिओ शेअर करत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सना देखील आपल्या भावना आवरता येत नाहीय. तसेच हा व्हिडीओ तेथील परिस्थिती आणि परिणामांची सर्वांना जाणीव करुन देत आहे.

याआधी आणखी एक असाचा व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एक बाप आपल्या मुलीला सुरक्षित स्थळी पाठवताना तिला शेवटा निरोप देताना रडला होता.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की,  वडील बसमध्ये बसून आपल्या मुलीचा निरोप घेत आहेत, यादरम्यान वडील आणि मुली दोघांचेही डोळे पाणावले आहेत.