Viral Video : मोटा खेल झाला यार! नवरी राहिली बाजूला नवरदेव पडला मित्रांच्या प्रेमात

Bride Groom Video :  एका भारतीय (Indian wedding) मित्राच्या लग्नात त्याचा दोन बेस्ट फ्रेंडने (Best friends) जे केलं त्यानंतर नवरदेवाचे हौश उडाले.  

Updated: Nov 16, 2022, 07:38 AM IST
Viral Video : मोटा खेल झाला यार! नवरी राहिली बाजूला नवरदेव पडला मित्रांच्या प्रेमात title=
trending on social media men wearing sarees Video Viral nmp

Trending Men Wearing Sarees : लग्नामध्ये नवरा-नवरीवर (Bride Groom ) सगळ्यांचा नजरा खिळलेल्या असतात. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल (video viral on social media) होतो आहे. वराच्या मित्राने लग्नामध्ये असं काही केलं की सर्वत्र एकच चर्चा...अगदी नवरदेव-नवरी राहिले बाजूला प्रत्येक जण या मित्रांचीच चर्चा होते. एवढं नाही तर आज जगभरात या दोघांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्ही म्हणाल असं काय केलं त्या दोघांनी, तर त्या दोघांनी जे केलं त्याचा आपण स्वप्नातही विचार करु शकतं नाही. त्याचा तुम्हीच पाहा त्यांनी काय केलं ते...

मोटा खेल झाला यार! 

भारतीय लग्न म्हटलं की, साडी दागिनी...भारतीय लग्नाविषयी पदेशातील लोकांना विशेष आकर्षण असतं. मग काय एका भारतीय (Indian wedding) मित्राच्या लग्नात त्याचा दोन बेस्ट फ्रेंडने (Best friends) जे केलं त्यानंतर नवरदेवाचे हौश उडाले. नवरी राहिली बाजूला मित्रांना पाहून नवदेवाच्या भुवया उंचावल्या. नवरी मित्रांमधील ही सगळी मजा दूर उभी राहून पाहतं होती.

'हर एक फ्रेंड...'

सोशल  मीडियावर ट्रेडिंग (Trading on Social Media) होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन यूएस मित्रांनी नवरदेवाला सप्रराईज देण्यासाठी साडी आणि टिकली लावू मोठ्या थाट्यात लग्नात एन्ट्री घेतात. मग काय राव चर्चा तर होणारच ना. मैत्री असतेच अशी आपल्या मित्रासाठी तो काहीही करतो. जो मित्र संकटात उभा असतो तोच मित्र मित्राची टांग खेचण्यातही पुढे असतो. लग्नामध्ये नवरदेव किंवा नवरीचे मित्रमंडळी त्यांची टांग खेचण्यासाठी काही ना काही करतात. पण या मित्रांनी तर हद्दच केली म्हणूनच म्हणतात का हर एक फ्रेंड कमीना होता है. 

या दोघा मित्रांनी कपड्यांबद्दल लिंगभेद मोडून यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. पॅरागॉन फिल्म्स शिकागो वेडिंग व्हिडीओग्राफरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) अकाऊंटवर शेअर केला होता. त्यानंतर या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या मित्रांचं सर्वत्र खूप कौतुक होतं आहे.