मुंबई : लग्नानंतर लोक काही दिवस हनीमूनला जातात. पण असं एक जोडपं आहे जे गेल्या 12 महिन्यांपासून हनीमूनवर आहेत आणि ते पुढे हनीमून सुरू ठेवण्याची योजना करत आहेत. हनीमूनवर 12 महिने झाले मग आता ते खर्च कसा काढत असतील, असा विचार अनेकांना आला असेल. त्यासाठी ते काय करतात हे ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल.
लग्नानंतर हे जोडप 10 वर्षांच्या हनीमूनवर निघाले आहेत. गेल्या एक वर्षापासून या जोडप्यानं विविध देशांना भेट देली आणि आता ते पुढेही असचं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रिपची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ते दररोज फक्त 640 रुपये खर्च करतात. दररोज ते समान रक्कम वापरतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हनीमूनला असताना हे कसे पैसे कमावत असतील.
31 वर्षीय सिल्क मुयस आणि 29 वर्षीय कायरन शॅनन हे जोडपं 10 वर्षांसाठी हनीमूनला निघालं आहे. 2019 मध्ये स्पेनमध्ये दोघांची भेट झाली होती. मग मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2021 मध्ये दोघांनी स्कॉटलंडमध्ये लग्न केलं. नुकताच त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. गेल्या एक वर्षापासून हे जोडपं हनीमूनवर आहे.
सिल्क आणि कायरन यांना फिरायला आवडतं. त्यामुळे त्यांनी आपला हनीमून पिरियड सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हनीमूनवर 10 वर्षे राहण्याचा विचार केला आहे. ते दररोज ६४० रुपये खर्च करतात. यासाठी ते स्वस्त असलेल्या ठिकाणी राहतात. लांबचा प्रवास करण्यासाठी त्यांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागते. रिपोर्टनुसार, ते स्वतःचे न्यूड फोटो विकून दरमहा 31,862 हजार रुपये कमवतात. ते दर शुक्रवारी त्यांचे न्यूड फोटो विकतात.
कायरन म्हणाली, आम्ही खूप सुंदर आयुष्य जगत आहोत. हे जोडपं गेल्या वर्षभरात आइसलँड, स्पेन आणि पोर्तुगाल फिरलं आहे. याशिवाय हे जोडपं श्रीलंकेत तीन महिने राहिलं. यानंतर या भारत, नेपाळ आणि थायलंडमध्ये हनीमूनही पीरियडचा आनंद घेतला.
हे दोघे ही डान्सर आहेत. आम्हाला लोकांना त्यांच्या शरिराविषयी जागरुक करायचे आहे, त्यांना सकारात्मक संदेश द्यायचे आहे. आम्ही दोघंही त्याबद्दल खूप कम्फर्टेबल आहोत.
कायरन ही स्कॉटलंडची तर सिल्क बेल्जियमचा आहे. जेव्हा ती स्कॉटलंडमध्ये एका फोटोग्राफरसाठी मॉडेलिंगसाठी गेली होती, त्यावेळी तिची भेट सिल्कशी झाली होती. 20 ऑगस्ट 2021 रोजी आमचं लग्न झालं. लग्नानंतर दोघांनीही संसार करण्याचा निर्णय घेतला. ते 10 वर्षांत संपूर्ण जगाचा प्रवास करणार आहेत. पैसे कमावण्यासाठी फोटो विकण्यापासून स्थानिक हॉटेलमध्ये गाणी गातात आणि बॅन्ड वाजवतात. काहीवेळा स्पॉन्सर्ड इन्स्टाग्राम पोस्टमधूनही पैसे मिळतात. बऱ्याचवेळा यामुळे त्यांना चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळते.