राजाचे तब्बल 5 हजार महिलांशी संबध! सवय सोडवण्यासाठी शरीरात टाकलं फीमेल हार्मोन

राजा जुआन हा सेक्स अ‍ॅडिक्ट होता. त्यांचे हे व्यसन संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय होते कारण देशाचे नाव बदनाम होत होते.

Updated: May 14, 2022, 01:50 PM IST
राजाचे तब्बल 5 हजार महिलांशी संबध! सवय सोडवण्यासाठी शरीरात टाकलं फीमेल हार्मोन title=
representative image

नवी दिल्ली : स्पेन(Spain)च्या राजघराण्यातील माजी राजा, जुआन कार्लोस यांनी 1975 मध्ये राजा म्हणून पदभार स्वीकारला. आता जुआनसंदर्भातील एका वादग्रस्त बातमीने सर्वांनाच हैराण केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, जुआन हा सेक्स अ‍ॅडिक्ट होता. त्यांचे हे व्यसन संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय होते कारण देशाचे नाव बदनाम होत होते.

जगातील विविध देशांतील राजे आणि सम्राटांशी संबंधित अनेक कथा इतिहासात नोंदल्या गेल्या आहेत. ज्या आजही चर्चेचा विषय ठरतात. या राजांची अशी अनेक रहस्ये आहेत जी फार कमी लोकांना माहिती आहेत. सध्या स्पेनच्या एका माजी राजाशी संबंधित एक बातमी चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच त्याचे एक विचित्र सत्य जगासमोर आले आहे. 

स्पॅनिश राजघराण्यातील (Spanish Royal Family) माजी राजा, जुआन कार्लोस (Juan Carlos) यांनी 1975 मध्ये राजा म्हणून पदभार स्वीकारला. आता जुआनशी संबंधित एका वादग्रस्त बातमीने सर्वांनाच हैराण केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, जुआन हा सेक्स अ‍ॅडिक्ट (Sex Addict) होता. त्यांचे हे व्यसन संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय होते.

नुकताच स्पेनचे माजी पोलीस आयुक्त जोस मॅन्युएल विलारेजो यांनी सुनावणीदरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की जुआनला सेक्सचे इतके व्यसन होते की त्याचे 5000 हून अधिक महिलांशी संबंध होते. परंतू हे व्यसन देशासाठी बदनामीकारक ठरत होते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, महिला हार्मोन्स त्यांच्या शरीरात टाकावे लागले जेणेकरून त्यांच्यातील पुरुष हार्मोन्स कमी होऊ शकतील.

स्पॅनिश इतिहासकार Amadeo Martinez Ingles यांनी uan Carlos: The King Of 5,000 Lovers नावाचे एक पुस्तक देखील लिहिले आहे.

स्पॅनिश गायक, बेल्जियन गव्हर्नस आणि इटालियन राजकुमारी यांच्याशी त्यांचे संबंध असल्याच्या बातम्या देखील आल्या आहेत. जुआनने अवघ्या 6 महिन्यांत 62 महिलांसोबत सेक्स केल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. जुआन सध्या निर्वासित असून अबुधाबीमध्ये राहत आहे. जुआनवर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप होता. त्यानंतर तो देश सोडून पळून गेला.