सैफ अली खानला मोठा धक्का : पतौडी कुटुंबाची 15000 कोटींची संपत्ती सरकार जप्त करणार?

Saif Ali Khan Pataudi Property : सैफ अली खानच्या पतौडी कुटुंबाची 15000 कोटींची संपत्ती सरकार जप्त करणार? नेमकं काय जाणून घ्या...

दिक्षा पाटील | Updated: Jan 22, 2025, 10:53 AM IST
सैफ अली खानला मोठा धक्का : पतौडी कुटुंबाची 15000 कोटींची संपत्ती सरकार जप्त करणार? title=
(Photo Credit : Social Media)

Saif Ali Khan Pataudi Property : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर नुकताच हल्ला झाला. त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर मंगळवारी म्हणजेच काल तो घरी परतला. या सगळ्यात त्याला एक मोठा धक्का बसला आहे. ती वाईट बातमी म्हणजे मध्यप्रदेशच्या भोपालमध्ये असलेल्या पतौडी कुटुंबाची संपत्ती ही सरकारच्या ताब्यात जाण्याशी शक्यता आहे. 2015 मध्ये हायकोर्टानं पतौडी कुटुंबाच्या संपत्तीवर लावण्यात आलेली बंदी उचलली आहे. आता सरकार ही मालमत्ता जप्त करु शकणार आहे. या मालमत्तेची अंदाजे किंमत ही 15,000 कोटी असल्याचं म्हटलं जातं. 

सरकार या संपत्तीला शत्रू संपत्ती अधिनियम 1968 अंतर्गत सरकारच्या अंतर्गत नियंत्रणात आणू शकते. एनडीटीव्हीनं रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानच्या कुटुंबाशी संबंधीत फ्लॅग स्टाफ हाउस सारखी ठिकाणं आहेत. तिथेच सैफनं त्याचं बालपण घालवलं. त्याशिवाय नूर-उस-सबा पॅलेस, दार-उस-सलाम आणि इतर गोष्टी देखील संबंधीत आहे. हा निर्णय ऐकवत जस्टिस विवेक अग्रवालनं सांगितलं की सुधारित शत्रू मालमत्ता कायदा, 2017 अंतर्गत वैधानिक उपाय उपलब्ध आहेत आणि त्यांनी या संबंधीत पक्षांना 30 दिवसांच्या आत निवेदने दाखल करण्याचे निर्देश दिले.

शत्रु संपत्ती अधिनियम केंद्र सरकारच्या विभाजनानंतर पाकिस्तानात गेलेल्या लोकांची संपत्ती जप्त करण्याची परवानगी दिली होती. भोपालचे शेवटचे नवाब हमीदुल्ला खान यांना तीन मुली होत्या. त्यांची सगळ्यात मोठी मुलगी आबिदा सुल्तान 1950 मध्ये पाकिस्तानात गेली. दुसरी लेक साजिदा सुल्तान भारतात राहिली आणि तिनं नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांच्याशी लग्न आणि संपूर्ण संपत्तीची वारस झाली. 

साजिदा सुल्तान यांचा नातू सैफ अली खानला संपत्तीचा एक भाग हा वारसाहक्काने मिळाला. तर सरकारनं आबिदा सुल्तान यांच्या मायग्रेशनवर लश्र केंद्रित केले आणि या संपत्तीवर 'शत्रु संपत्ति' च्या आधारे दावा करण्यात आला. 2019 मध्ये न्यायालयानं साजिदा सुल्तान यांना वारसाच्या रुपात स्वीकारण्यात आलं. नुकत्याच निर्णयानं पतौडी कुटुंबाच्या समस्या वाढल्या आहेत. मात्र, या सगळ्यात सैफ, करीना किंवा त्यांच्या कुटुंबातून कोणीही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.