झीनत अमान थोडक्यात बचावल्या! गळ्यात अडकलेल्या गोळीमुळे श्वास घेता येई ना अन्...; स्वत: सांगितला घटनाक्रम

Zeenat Aman Pill Stuck in Throat : कशा थोडक्यात बचावल्या झीनत अमान; स्वत: सांगितला घटनाक्रम...

दिक्षा पाटील | Updated: Jan 22, 2025, 11:23 AM IST
झीनत अमान थोडक्यात बचावल्या! गळ्यात अडकलेल्या गोळीमुळे श्वास घेता येई ना अन्...; स्वत: सांगितला घटनाक्रम title=
(Photo Credit : Social Media)

Zeenat Aman Pill Stuck in Throat : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांच्यासोबत काल रात्री अशी काही घटना झाली ज्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत जेव्हा ही घटना झाली तेव्हा त्यांच्यासोबत घरी कोणीच नव्हतं. त्यांनी लगेच मुलगा जहानला फोन केला आणि तो लगेच घरी पोहोचला आणि त्यानं झीनत यांची मदत केली. खरंतर, झीनत जेव्हा रात्री झोपण्यासाठी जात होत्या तेव्हा त्या आधी त्या त्यांच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या खात होत्या. तेव्हा अचानक त्यांच्या गळ्यात गोळी अडकली आणि त्यांना श्वास घेण्यास अडचण होऊ लाहली. झीनत अमाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्यासोबत नेमकं काय झालं याविषयी सांगितलं आहे. 

73 वर्षांच्या झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत सांगितलं की 21 जानेवारी रोजी त्यांच्यासोबत काय काय घडलं. झीनत यांनी सांगितलं की अंधेरी ईस्टच्या एका स्टूडियोमध्ये दिवसभर शूटिंग केल्यानंतर जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा नेहमीप्रमाणे त्या त्यांच्या ब्लड प्रेशरची गोळी खाऊ लागल्या. त्यांनी गोळी तोंडात ठेवली आणि पाणी प्यायले. पण गोळी घश्यात अडकली आणि सतत पाणी प्यायलानंतरही ती गोळी अडकलीच होती. झीनक अमान यांचा श्वास हा जवळपास अडकला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

झीनत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ना तर त्या गोळीला गिळू शकत होत्या आणि नाही बाहेर काढू शकत होत्या. त्या खूप पाणी प्यायल्या होत्या, पण गोळी हलतच नव्हती. त्यावेळी घरी कोणी नव्हतं. त्यावेळी त्या खूप घाबरल्या. डॉक्टरांना फोन केला तर सतत तो बिझी येऊ लागला. मग त्यांनी मुलगा जहानला फोन केला. जहान तेव्हा कुठे बाहेर गेला होता आणि जेव्हा तो घरी परतला तेव्हा झीनत यांची परिस्थिती आणखी बिकट झाली होती. जहाननंतर त्याची आई झीनत यांनी डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितलं की गोली हळू हळू वितळेल. त्यानंतर झीनत या त्याच्या काही काळात सतत हळूहळू गरम पाणी पित होत्या. तेव्हा जाऊन त्याची परिस्थिती सुधारली. 

हेही वाचा : सैफ अली खानला मोठा धक्का : पतौडी कुटुंबाची 15000 कोटींची संपत्ती सरकार जप्त करणार?

त्यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर झीनत अमान लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'द रॉयल्स' मध्ये दिसणार आहेत. त्याशिवाय त्या मनीष मल्होत्राच्या 'बन टिक्की' या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.