प्रयागराज महाकुंभ मेळ्यात सिलेंडर ब्लास्ट झाला. मात्र खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने प्रयागराज महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ई-मेल पाठवला आहे, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच असून ही सुरुवात असल्याच म्हटलं जातं.
रविवारी संध्याकाळी जवळपास चारच्या सुमारास महाकुंभच्या सेक्टर 19 मध्ये असलेल्या गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये एका सिलेंडरचा ब्लास्ट झाला. या घटनेत 200 कॉटेज जळून राख झाले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चहा बनवल्यानंतर सिलेंडर लिक झाल्यानंतर आग लागली. आता खलिस्तानी संघटनेने स्फोटाची जबाबदारी घेतली आहे.
ईमेलमध्ये लिहिल्यानुसार, हा स्फोट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला आहे. यामध्ये लिहिलं आहे की, हा हल्ला खलिस्तान जिंदाबाद फोर्स या संघटनेकडून केला आहे. आम्हाला कुणालाही नुकसान पोहोचवायचं नाही. मात्र ही घटना मुख्यमंत्री योगी आणि त्यांच्या प्रशासनाला सतर्क केलं आहे. ईमेलमधून असा दावा केला आहे की, ही घटना पिलीभीत चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. ईमेल खलिस्तानी संघटनेचानचकमकीत सहभागी असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांचा हँडलर फतेह सिंग बागी हा तरणतारनचा रहिवासी आहे. बागी शिक्षणासाठी परदेशात गेला होता. त्याचे वडील जोगिंदर सिंग आणि आजोबा दोघेही भारतीय सैन्यात होते. त्याच वेळी, बागीचा मोठा भाऊ गुरजीत सिंग अजूनही भारतीय सैन्यात आहे आणि राजस्थानमध्ये तैनात आहे.
जगजीत सिंग उर्फ फतेह सिंग बागी याला अटक होऊन दहा वर्षे झाली आहेत आणि तो परदेशात राहत आहे, असे जोगिंदर सिंग यांनी माध्यमांना सांगितले होते. तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करण्यासाठी युकेला गेला. आठ वर्षांपूर्वी दुसऱ्या जातीत लग्न केल्यानंतर त्याच्या कुटुंबाने तिला नाकारले. तो यूके आर्मीमध्ये सामील झाला. तो लढण्यासाठी अफगाणिस्तानातही गेला होता.
पीलीभीत एनकाऊंटर 23 डिसेंबर रोजी झाला होता. पीलीभीत पोलिसांनी 3 खलिस्तानी दहशतवाद्यांना मारलं होतं. त्यांच्यावर पंजाबमधील एका पोलिस चौकीवर ग्रेनेड हल्ल्याचा आरोप होता. तिघेही पळून गेले होते आणि पिलीभीतमध्ये राहत होते. पंजाब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यूपी पोलिसांनी ही कारवाई केली.