Rare Oarfish or Doomsday Fish In Southern California: पृथ्वीचा अंत अटळ आहे, अशी भविष्यवाणी कैक वर्षांपूर्वी करण्यात आली होती, या भाकितानं अनेकांनाच धडकी भरली. इथं पृथ्वीच्या विनाशाची काही कारणं चिंता वाढवत असतानाच आता एका माशानं जगाच्या विध्वंसाचे संकेत दिले आहेत. बाबा वेंगा आणि नॉस्त्रेदमस यांनीही जगाच्या अंताचे संकेत दिल्यानंतर आता हा मासा दिसणं म्हणजे धोक्याची सूचना गृहित धरली जात आहे.
दक्षिण कॅलिफोर्नियातील एंसीनिटास बीच इथं तिसऱ्यांदा ओरफिश किंवा डूम्सडे नावाचा एक मासा मृतावस्थेत आढळला आहे. जपानी मान्यतांनुसार ही एक अशुभसूचक घटना असून या माशाच्या नावातच त्यासंबंधीचा उल्लेख आहे. जपानी भाषेत या माशाला डूम्सडे असं संबोधलं जातं, याचा अर्थ 'शेवटच्या दिवसाचा मासा' सांगितला जातो.
यावेळी मृतावस्थेत आढळलेला मासा साधारण 10 फूट लांबीचा असल्याचं सांगम्यात आलं. हा मासा सिप्रिप्स इंस्टीट्यूशन ऑफ ओशनोग्राफीच्या मानद पदवीचं शिक्षण घेणाऱ्या एलिसन लॅफेरियरला किनाऱ्याच्या दिशेनं येताना दिसला. कॅलिफोर्नियामध्ये दिसलेल्या या माशासंदर्भात असणाऱ्या जपानी समजुतीमुळं जगाच्या अंतासंबंधीच्या भाकितानं पुन्हा लक्ष वेधलं. साधारण 17 व्या शतकामध्ये जपानमध्ये या माशाशी संबंधित काही मुद्दे सर्वप्रथम प्रकाशात आले होते.
जपानी लोककथेनुसार ओरफिश अर्थात काहीसा चपटा आणि निमुळत्या आकाराचा हा मासा समुद्रदेवता र्युझिनच्या सेवकांचं प्रतिनिधीत्वं करतो. ज्यामुळं त्याला "र्यूगु नो त्सुकाई" असंही म्हटलं जातं. समुद्र देवतेच्या महालातील संदेशवाहक असा या शब्दाचा अर्थ. एकिकडे या माशाविषयीची ही भाकितं समोर येत असतानाच दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये या माशांचा मृत्यू का होत आहे यामागचं कारण वैज्ञानिक शोधत आहेत.
सिप्रिप्सचे तज्ज्ञ बेन फ्रेबल यांच्या माहितीनुसार समुद्रातील स्थितीमध्ये झालेल्या बदलांमुळं हा मासा किनाऱ्यावर आलेला असू शकतो. समुद्रातील बदलांमध्ये ला निना आणि एल निनो यांसारख्या परिस्थितीचा समावेश असू शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.