Sunita Williams News : मागील तीन आठवड्यांहून अधिक काळापासून नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांनी अवकाशात अनेक अडचणींचा सामना केला. बोईंग स्टारलायनर या त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळं विलियम आणि विल्मोर यांचा परतीचा प्रवास आणखी लांबणीवर पडताना दिसत आहे. त्यातच या अंतराळयानात किमान दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा उपलब्ध असल्यामुळं ही अडचणही डोकं वर काढताना दिसत आहे. दरम्यान या संपूर्ण मोहिमेमध्ये विलियम्स यांना खरंच धोका आहे का, यासंदर्भातील माहितीसुद्धा नासानं नुकतीच दिली आहे.
नासाच्या वरिष्ठ हुद्द्यावर असणाऱ्या अधिकाय़ऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक आव्हानं येऊनही सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना तूर्तास अंतराळात कोणताही धोका नसून ते दोघंही सुरक्षित आहेत. नासाच्या कमर्शियल चालक दल या उपक्रमातील प्रोग्राम मॅनेजर स्टीव्ह स्टीच यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार एजेन्सी मिशनचा कालावधी वाढवून 45 वरून 90 दिवसांपर्यंत वाढवण्याचा विचार करण्यात येत आहे.
स्टारलायनरमध्ये परीक्षण आणि मूल्यांकन अद्याप जारी असून, या मोहिमेचा कालावधी वाढवून त्यामध्ये शोधलेल्या समस्येवर तोडगा काढणं हा त्यामागचा मुख्य हेतू असल्याचं सांगितलं जात आहे. पण, तरीही अंतराळवीरांना पृथ्वीवर परतण्यास आणखी अधिक कालावधी अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे.
बोईंग प्रकल्पातील उपाध्यक्ष आणि प्रबंधक मार्क नप्पी यांच्या माहितीनुसार हेलियम लीकमुळं प्राथमिक अडचणी डोकं वर काढत असल्या तरीही मू ळ कारणाचं परीक्षण करण्यासाठी सध्या संपूर्ण नासाची टीम प्रयत्न करताना दिसत आहे. नप्पी यांच्या माहितीनुसार हे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर अंतराळयात्रींना डॉक वरून पत आणलं जाऊ शकतं. दरम्यानच्या काळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथं असणारे अंतराळवीर त्यांच्यावर सोपवण्यात आलेली कामं पूर्णत्वास नेताना दिसत आहेत.