Mysterious well in portugal : भटकंतीचं वेड असणाऱ्या अनेकांनाच काही अशी ठिकाणं ठाऊक असतात जी ठिकाणं नव्या प्रश्नांना जन्म देतात. असंच एक ठिकाण सोशल मीडियामुळं प्रकाशात आलं. स्थानिकांनी सांगितलेल्या कथा, इथं भेट देण्यासाठी आलेल्यांचे अनुभव या साऱ्यासह हे ठिकाण असं काही चर्चेत आलं की, तेथील रहस्य शोधण्यासाठी अनेकांनीच Google चाही आधार घेतला.
पोर्तुगालमधील सिन्तारा इथं असणाऱ्या या ठिकाणाचं नाव आहे, (initiation well) इनिटिएशन वेल. हे ठिकाण आजही अनेकांसाठी रहस्य असून, ही एक अशी विहीर आहे जिथं कायमच एक विचित्र असा उजेड पाहायला मिळतो. संशोधक, अभ्यासकांनाही आजवर या प्रश्नाचं उत्तर मिळू शकलेलं नाही. पण, खरंच हा उजेड कुठून येतो?
काहीजण या विहिरीला 'विशिंग वेल'ही म्हणतात. असं म्हणतात की, ही विहीर प्रत्येकाची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. ज्यामुळं इथं प्रत्येकजण एखादं नाणं टाकून आपली इच्छा मागतं आणि ती पूर्ण होण्याची मनोकामना करतं. पण, तरीही त्या उजेडाचं काय?
सहसा विहीर हा एक पाण्याचाच स्त्रो असून, विहीरीतील पाण्याचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. पण, ही विहीर मात्र या साऱ्याला अपवाद आहे. या विहिरीचा वापर धार्मिक दीक्षा संस्कारांसाठी केला जातो. पण, या विहिरीची बांधणी का करण्यात आली आहे हे मात्र कोणाच्याही लक्षात आलेलं नाही.
विहीरीमध्ये उजेड दिसणं ही अतिशय अनपेक्षित बाब आहे, ज्यामुळं बड्या अभ्यासकांनाही या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही. साधारण चार मजली इमारतीच्या उंचीची ही विहीर असून, तिची खोली प्रचंड आहे. असंही सांगितलं जातं की, ही विहीर जितची जमीनीच्या अंतर्गत भागात खोल होत जाते तितकीच चिंचोळी होत जाते. हे सारं मान्य, पण या उजेडाची उकल मात्र आजही झालेली नाही हेसुद्धा तितकंच खरं.