कुख्यात खलिस्तानी बिकरीवाल या अतिरेक्याला दुबईतून अटक

  कुख्यात खलिस्तानी अतिरेक्याला (Khalistan's Terrorist) दुबईतून अटक करण्यात आली आहे. 

Updated: Dec 31, 2020, 01:05 PM IST
कुख्यात खलिस्तानी बिकरीवाल या अतिरेक्याला दुबईतून अटक  title=

नवी दिल्ली : पंजाबमध्ये विविध गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या कुख्यात खलिस्तानी अतिरेक्याला (Khalistan's Terrorist) दुबईतून अटक करण्यात आली आहे. सुख बिकरीवाल (Sukh Bhikhariwal) असे या अतिरेक्याचे नाव आहे. गुप्तचर यंत्रणेने दुबईतून त्याच्या मुसक्या आवळल्या. (Khalistan's Terrorist Sukh Bhikhariwal arrested in Dubai)

पाकिस्तानमधील आयएसआयच्या इशाऱ्यावर सुख बिकरीवाल काम करायचा. शौर्य चक्र विजेत्या बलविंदूर सिंधू हत्याकांडाचा तो प्रमुख सूत्रधार होता. सुपारी घेऊन हत्या करण्याचं काम तो करायचा. पंजाब पोलीस आता त्याची चौकशी करणार आहेत.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी पंजाबमध्ये लक्ष्य ठेवणा गॅँगस्टर सुखमीत पाल सिंह उर्फ ​​सुख बिकरीवालला अटक केली आहे. सुख बकरीवाल याला दुबईहून सुरक्षा एजन्सी दिल्लीत आणले होते, तेथे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने त्याला दिल्ली विमानतळावर अटक केली आहे.  

विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात पाच दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत बिकारीवाल याच्याबद्दल माहिती उघडकीस आली. सध्या बिकरीवाल याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशी दरम्यान तो दहशतवादी संघटना भारतात अशांतता पसरवण्याची तयारी कशी करतात याबद्दल अनेक महत्त्वाचे खुलासे करू शकतो.

डिसेंबरच्या सुरुवातीला दिल्लीत अटक झालेल्या तीन दहशतवाद्यांनी पंजाबमधील पोलिस अधिकारी बलविंदर संधूची हत्या केली. या तीन आरोपींनी चौकशीत ही हत्या केल्याचे कबूल केले होते. त्यांना सुख बिकरीवाल याने दुबईहून संधूला ठार मारण्याचा आदेश दिला होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या आदेशानुसार बिकरीवाल याने त्यांना हा आदेश दिला.