पॅलेस्टाइनमधील 'हमास' ही दहशतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये सध्या युद्ध सुरु असून जग सध्या चिंतेत आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला फार मोठी किंमत चुकवावी लागेल असं सांगत त्यांना गुडघ्यावर आणण्याचं आव्हान दिलं आहे. सध्या दोन्ही देशांकडून एकमेकांवर रॉकेट डागले जात असून, इमारती कोसळल्या असून मृतदेहांचे खच पडले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या युद्धाचा अंत काय असेल याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात असले, तरी निश्चित उत्तर कोणाकडेच नाही. यादरम्यान फ्रेंच तत्वज्ञानी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात केलेली एक भविष्यवाणीही चर्चेत आहे.
इस्रायलने युद्ध घोषित केल्यानंतर फ्रेंच तत्त्वज्ञ नॉस्ट्रॅडॅमस यांची एक भितीदायक भविष्यवाणी खरी ठरली असावी असं बोललं जात आहे. मिशेल डी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 2023 मध्ये 'मोठं युद्ध' होईल असं भाकीत वर्तवलं होतं.
नॉस्ट्रॅडॅमसने गेल्या 100 वर्षात जर्मनीचा हुकूमशाह अॅडॉल्फ हिटलरच्या उदयापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यावरील गोळीबार आणि 2022 मध्ये दैनंदिन जीवनातील संकटापर्यंतच्या अशा अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. या ज्या खऱ्या ठरल्या होत्या.
2023 चा संदर्भ देत, नॉस्ट्रॅडॅमसने 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात लिहिलं होतं की, 'सात महिन्यांचं एक मोठे युद्ध होईल, ज्यामध्ये लोक त्यांच्या वाईट कृत्यांमुळे मरतील आणि रौएन आणि एव्हरेक्स राजाच्या अधीन राहणार नाहीत'.
यादरम्यान बाबा वेंगाने दर्शवलेली एक भविष्यवाणीही चर्चेत आहे. त्यांनी मुस्लीम देशांमधील युद्धाबाबत भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगाने सोव्हियत युनिअनचं विघटन, अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला, आयएसआयचा उदय यासंबंधी भविष्यवाणी वर्तवली होती जी तंतोतंत खरी ठरली होती. यामुळेच जगभरात अनेकजण या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. त्यामुळेच इस्त्रायल-हमास संघर्षादरम्यान त्यांनी केलेल्या मुस्लीम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी चर्चेत आहे.
बाबा वेंगाचं नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होतं. ती बल्गेरियातील एक फकीर महिला होती. बाबा वेंगा यांचा जन्म 1911 साली झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. 11 ऑगस्ट 1996 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचं निधन झाले. बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी अनेक भविष्यवाणी केल्या होत्या.
बाबा वेंगाच्या अंदाजानुसार 2023 मध्ये तिसरं महायुद्ध होऊ शकतं. यासोबतच त्यांनी सांगितलं होतं की, अण्वस्त्र हल्लादेखील होऊ शकतो, ज्यामुळे पृथ्वीवर विध्वंस होऊ शकतो. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे लोक घाबरले आहेत. त्यामुळे हे तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे का? अशी शंका लोकांना सतावत आहे.