खेळता खेळता तिने बॉयफ्रेंडला सूटकेसमध्ये बंद केलं, त्यानंतर ती दारू पिऊन झोपली; पुढे काय घडलं?

Lover in Suitcase : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये एका महिलेने खेळता खेळता बॉयफ्रेंडला सूटकेसमध्ये बंद केलं. एवंढ नाही तर त्यानंतर ती दारू पिऊन झोपून गेली. पुढे जे घडलं ते अतिशय भयानक आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 28, 2024, 11:03 AM IST
खेळता खेळता तिने बॉयफ्रेंडला सूटकेसमध्ये बंद केलं, त्यानंतर ती दारू पिऊन झोपली; पुढे काय घडलं? title=
girlfriend locked her boyfriend in a suitcase then drank herself to sleep Suitcase Murder world viral news

Lover in Suitcase Murder : एक अशी बातमी ज्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. ही बातमी विचित्र वाटत असली तरी कधी कधी अशा घटना घडतात ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण असतं. लपंडाव हा खेळ लहानपणी सर्वांनीच कधी ना कधी खेळला आहे. पण या महिलेने लपंडाव खेळताना हद्दच केली. या महिलेने खेळा खेळात प्रियकराला सूटकेसमध्ये बंद केलं. धक्कादायक म्हणजे त्यानंतर ती दारु पिऊन झोपून गेली. नेमकं काय घडलं हे जाणून तुम्हाला धक्काच बसेल. 

नेमकं काय प्रकरण आहे?

त्या महिलेचं नाव बून असं आहे. 47 वर्षीय बूनने सुरुवातीला सांगितलं की ती आणि तिचा प्रियकर जॉर्जेस फेब्रुवारी 2020 मध्ये दारु पिऊन लपंडाव खेळत होते. जेव्हा तो त्याच्या स्वत: च्या स्वेच्छेने सूटकेसमध्ये गेला. हे सगळं विनोदाचा भाग होता. तेव्हा तिने त्याला बाहेरून बंद केले आणि सूटकेसवर एक साखळी घातली.

महिलेनं पुढे सांगितलं की तिच्या प्रियकराने काही काळापूर्वी तिच्यावर अत्याचार केला होता आणि जेव्हा तो सूटकेसमध्ये बंद होता तेव्हा तिने तिच्या भावना व्यक्त करण्याचा विचार केला. दोघांमध्ये वाद सुरू झाला.
आता त्या महिलेला वाटू लागलं की जर तिचा प्रियकर जॉर्जेस टोरेस जूनियर अशा वेळी बाहेर आला तर तो तिच्यावर हल्ला करू शकतो. अशा स्थितीत तिने त्याला पेटीमध्ये सोडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा गुदमरून मृत्यू झाला. 

कोर्टात दाखवण्यात आला घटनेच्या दिवशीचा व्हिडीओ

बूनच्या फोनवरून मिळालेल्या व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये, ती हसताना आणि सुटकेसमध्ये बेसबॉल बॅटने हात मारताना दिसत आहे. कारण त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. कोर्टात प्ले झालेल्या व्हिडीओमध्ये बूनचा प्रियकर त्याला श्वास घेऊ शकत नसल्याचे वारंवार सांगत असल्याचं दिसत आहे. यावेळी महिला हसत होती. जेव्हा तिने मदतीसाठी हाक मारली तेव्हा ती महिला म्हणाली, 'तू माझा गळा दाबून मारतोस तेव्हा तेच करतोस' आणि 'ही तुझी चूक आहे.'

यानंतर महिला दारू पिऊन झोपी गेल्याचं सांगण्यात आलं. द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, जॉर्जेसच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या पाठीवर आणि मानेवर ओरखडे, त्याच्या खांद्यावर, टाळूवर आणि कपाळावर जखमा आणि त्याच्या ओठाजवळ एक कट यासह अनेक जखमांचा उल्लेख आहे. घटनेच्या चार वर्षांनंतर, 10 दिवसांच्या खटल्यात, ज्युरीने 90 मिनिटं विचारविनिमय केल्यानंतर शुक्रवारी त्याच्याविरुद्ध निकाल देण्यात आला.

ही घटना 2020 मधील अमेरिकेतील धक्कादायक घटना आहे. दरम्यान द गार्डियनच्या वृत्तानुसार, शुक्रवारी अमेरिकेतील फ्लोरिडामधील न्यायालयाने सारा बून या महिलेला सेकंड-डिग्री हत्येप्रकरणी दोषी ठरवलं. तिला 2 डिसेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.