व्हिडिओ : लंडनमध्ये २७ मजली इमारतीला भीषण आग

लंडनच्या पश्चिम भागात असणाऱ्या २७ मजली ग्रेनफेल टॉवरला काही वेळापूर्वी भीषण आग लागलीय. 

Updated: Jun 14, 2017, 09:34 AM IST
व्हिडिओ : लंडनमध्ये २७ मजली इमारतीला भीषण आग title=

लंडन : लंडनच्या पश्चिम भागात असणाऱ्या २७ मजली ग्रेनफेल टॉवरला काही वेळापूर्वी भीषण आग लागलीय. 

अग्निशमन दलाचे तब्बल ४० बंब आणि २०० कर्मचारी घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.

इमारतीत १२० कुटुंब अडकल्याची भीती व्यक्त होतेय. स्थानिक वेळेनुसार रात्री १ वाजून १६ मिनिटांनी ही आग लागल्याचं पुढे येतंय.

आगीचं कारण अद्याप पुढे आलेलं नाही. इमारतीतून दोन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं पीटीआयनं म्हटलंय.   ​