बापरे... तब्बल 10 कोटींना विकलं जातंय 'हे' उष्टं, अर्ध खाल्लेलं सॅण्डविच; कारण वाचाच

Sandwich For 10 Crore Rs: अधिक आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल 10 कोटी खर्च करुन हे सॅण्डवीच खरेदी केलं तरी ते अर्धच मिळणार आहे. कारण हे अर्ध सॅण्डवीच अर्ध खालेल्या अवस्थेत आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 14, 2024, 02:03 PM IST
बापरे... तब्बल 10 कोटींना विकलं जातंय 'हे' उष्टं, अर्ध खाल्लेलं सॅण्डविच; कारण वाचाच title=
सोशल मीडियावर या फोटोची चर्चा

Sandwich For 10 Crore Rs: सॅण्डविच... 2 ब्रेडच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा मसला भरुन तयार केल्या जाणाऱ्या या पदार्थाची किंमत अगदी 15 रुपयांपासून काही शे रुपयांपर्यंत असते हे आपल्यापैकी सर्वांनाच ठाऊक आहे. खरं तर हा पदार्थ सर्वच देशांमध्ये थोड्याफार फरकाने सहज उपलब्ध होतो. मात्र सध्या फेसबुकवर एक असं सॅण्डविच विक्रीसाठी उपलब्ध आहे की त्याच्या किंमताचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. 

10 कोटींचं सॅण्डविच

आता हे सॅण्डविच महाग असून असून किती महाग असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. फार फार तर काही शे किंवा काही हजारांमध्ये हे असेल असा तुमचा समज असेल तर जरा थांबा. कारण या सॅण्डविचची किंमत 1.3 मिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनामध्ये सांगायचं झालं तर जवळपास 10 कोटी रुपये एवढी या सॅण्डविचची किंमत आहे. मुळात एवढं महाग सॅण्डविच खरेदी करणं वेडेपणा ठरेल असं बहुतांश लोकांचं म्हणणं असेल. मात्र याहूनही अधिक आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल 10 कोटी खर्च करुन हे सॅण्डविच खरेदी केलं तरी ते अर्धच मिळणार आहे. कारण हे अर्ध सॅण्डविच अर्ध खालेल्या अवस्थेत आहे. काय! तुम्हीपण गोंधळून गेलात ना हे वाचून पण याबद्दल वाचणाऱ्या प्रत्येकाची अशी काहीशी अवस्था आहे.

...म्हणून विक्री

'न्यू यॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, सॅण्डविचच्या विक्रीसाठी फेसबुक मार्केटप्लेसवर पोस्ट करण्यात आली आहे. या ठिकाणी अनेकजण वापरलेला वस्तूंची खरेदी-विक्री करतात. सॅण्डविचसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इंग्लंडमधील लीस्टर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने मंगळवारी हे सॅण्डविच विक्रीसाठी या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलं आहे. हे नवीन ग्रील्ड आणि अर्धवट खाल्लेलं सॅण्डविच आहे, असं डिस्क्रीप्शनमध्ये लिहिलेलं आहे. यामध्ये थोडं चीज आणि मांस आहे. हे सॅण्डविच फारच कुरकुरीत आहे. हे सॅण्डविच त्याच्या मालकाला पूर्ण संपवता आलेलं नाही म्हणून ते विक्रीसाठी काढलं आहे, असंही पोस्टमध्ये लिहिलं आहे.

यापूर्वीही अनेकांनी केल्यात अशा पोस्ट

अशाप्रकारे फेसबुकच्या या माध्यमावर विश्वासही बसणार नाही अशा किंमतची मागणी करत अगदी साधी वस्तू पोस्ट करण्यात आल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी एका व्यक्तीने आपल्या दुपारच्या जेवणाचा फोटो पोस्ट केला होता. त्यात काही उकडलेले बटाटे आणि चवळीसारख्या शेंगा दिसत होत्या. माझ्याकडे हा पदार्थ खाण्यासाठी प्लेट नसल्याने तो मायक्रोव्हेवमधील प्लेटवर ठेवला आहे, असा विक्रेत्याचा दावा होता. 'मी एक मोबाईल इंजीनियर आहे. माझ्या व्हॅनमध्ये मायक्रोव्हेव आहे पण काहीतरी मी विसरलोय. म्हणून मला मायक्रोव्हेवची प्लेट वापरावी लागली आहे. मला माफ करा,' असं या कॅफ्शनमध्ये म्हटलं आहे.

अनेकांनी या अशा पोस्ट टाइमपाससाठी शेअर केल्या जातात असं म्हटलं आहे. या अशा पोस्ट करताच कामा नये असं तंत्रज्ञान विकसित होण्याची गरज काहींनी बोलून दाखवली आहे.