ERS-2 Earth Observation Satellite : पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी अंतराळात सोडण्यात आलेला उपग्रहच आता पृथ्वीसाठीचं मोठं संकट बनला आहे. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) चा 2300 किलो वजनाचा उपग्रह केव्हाही पृथ्वीवर कोसळू शकतो. या उपग्रहाचे क्रॅश लँडिंग रोखण्यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत. पृथ्वीच्या दिशेने सरकत असलेला हा उपग्रह सध्या मोठा धोका बनला आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीने 1995 मध्ये हा उपग्रह लाँच केला होता. ERS-2 Earth Observation Satellite असे या उपग्रहाचे नाव आहे. पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. पृथ्वीभोवती फिरत हा उपग्रह पृथ्वीचे निरीक्षण करत होता. ERS म्हणजेच युरोपियन रिमोट सेन्सिंग-2 ने तब्बल 16 वर्षे अंतराळात काम केले. 2011 मध्ये या उपग्रहाचे काम थांबवण्यात आले. तेव्हापासून हा उपग्रह नियोजनपद्धतीने पृथ्वीवर आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. दोन दोन महिन्यांच्या कालावधीत या उपग्रहाला पृथ्वीच्या जवळ आणले जात आहे. नियंत्रित पद्धतीने या उपग्रह पृथ्वीवर लँडिग करण्याची संशोधकांची योजना आहे.
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने हळू हळू या उपग्रहाला पृथ्वीच्या जवळ आणला जात आहे. आता उपग्रहाचे नियंत्रित पद्धतीने पृथ्वीवर लँडिग होणे कठिण झाले आहे. कारण, उपग्रह नियंत्रणाबाहेर गेला आहे. कारण, पृथ्वीवरुन पाठवलेले कमांड घेणे या उपग्रहाने बंद केले आहे. 21 फेब्रुवारीनंतर केव्हाही हा उपग्रह पृथ्वीवर कोसळू शकतो अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. सध्या अंतराळात मोठ्या प्रमाणात सौर वादळं सुरु आहेत. यामुळे पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या या उपग्रहाची दिशा बदलू शकते अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
अंतराळात सोडलेल्या उपग्रहांचे पृथ्वीवर सुरक्षित डीऑर्बिटिंग होणे अत्यंत गरजेचे आहे. उपग्रह अंतराळातच फिरत राहिले तर स्पेस गार्बेजचा धोका निर्माम होवू शकतो. किंवा अंतराळात हा उपग्रह इतर उपग्रहांना धडकण्याचा धोका असतो. 2011 मध्येच या उपग्रहातील इंधन संपले आहे. इंधन संपल्यामुळे हा उपग्रह पृथ्वीवर कोसळला तरी स्फोट होण्याचा धोका कमी झाला आहे. हा उपग्रह नियोजन पद्धतीने पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच आता हा उपग्रह नियंत्रणाबाहेर गेला आहे. यामुळे हा उपग्रह आता केव्हाही पृथ्वीवर धडकू शकतो अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे.