Prayagraj Viral Video: महाकुंभ मेळ्यासाठी भक्तांती अद्यापही गर्दी होत असून, आता मात्र स्थानिक या गर्दीला वैतागले आहेत. त्यांनी आता जाहीरपणे महाकुंभसाठी येणाऱ्या भक्तांना प्रयागराजला येऊ नका असं सांगण्यास सुरुवात केली आहे. याचं कारण भक्तांच्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत असून, सर्व व्यवस्था बिघडली आहे. एका स्थानिकाने Reddit ला व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्याने प्रयागराज आता अधिकृतपणे ब्रेकिंग पॉइंटवर पोहोचलं असल्याचं सांगितलं आहे. भक्त, पर्यटकांची इतकी गर्दी असल्याने स्थानिकांना दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणींची सामना करावा लागत आहे.
युजरने गेल्या वर्षभरात महाकुंभच्या पार्श्वभूमीवर कशाप्रकारे शहरात नवे रस्ते, फ्लायओव्हर्स आणि चांगली वाहतूक व्यवस्था निर्माम करण्यात आली याबद्दल सांगितलं आहे. पण आता इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची उत्सुकता पूर्णपणे थकव्यामध्ये बदलला आहे.
"आज 19 फेब्रुवारी आहे. अखेर अमृत स्नान आधीच संपलं आहे. महाकुंभ संपण्याच्या अखेरच्या टप्प्यात आपण पोहोचलो आहोत. मग आता ही गर्दी कमी होण्याऐवजी वाढू का लागली आहे?," असं स्थानिक सांगत आहे.
युजरने शहराच्या बिघडत्या परिस्थितीचे वर्णन केलं आणि म्हटलं की येथे महामार्गांवर गर्दी झाली आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था गजबजलेली होती आणि अगदी लहान गल्ल्याही लोक आणि गाड्यांनी भरलेल्या होत्या.
आपला अनुभव शेअर करताना त्यांनी स्थानिकांनाच वाहतूक कोंडीसाठी जबाबदार धरलं जात असल्याची खंत व्यक्त केली. "सर्वात वाईट बाब म्हणजे, आम्हाला स्थानिकांनाच जबाबदार धरलं जात आहेत. काल मी विचार केला की, जे काही राहिलं तिथे फिरुन घेऊयात. पण ही माझी मोठी चूक होती. मी माझी गाडी बाहेर काढली. यावेळी काही अज्ञातांनी मला थांबवलं आणि ओरडू लागले. तुमच्यामुळे इथे वाहतूक कोंडी होत आहे असं ते म्हणत होते," असा अनुभव त्यांनी सांगितलं आहे.
युजरने भक्तांना आपले दौरे पुढे ढकला अशी विनंती केली आहे. "कृपयाच्या देवाच्या प्रेमाखातर येणं थांबवा. गंगाजी आणि संगम कुठे जात नाही आहेत. तुम्ही नंतर शांतपणे येथे येऊ शकता. शहरावर आणि येथील लोकांवर थोडी कृपा करा. आम्ही भीक मागत आहोत," अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.
पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की पादचारी कोणत्याही नागरी शिष्टाचाराशिवाय थुंकत होते आणि कचरा टाकत होते. तसंच वाहनांमुळे आधीच बिघडलेली वाहतूक आणखी बिकट झाली होती. 13 जानेवीराला महाकुंभला सुरुवात झाली आणि आता 26 फेब्रुवारीला संपत आहे.